शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बॅलन्स अकाऊंटला किमान रोख मर्यादेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:12 IST

जनधन योजनेच्या नावाखाली केंद्र सरकारने सत्तारुढ झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे बॅँक खाते उघडले.

ठळक मुद्देशेतकºयांना अडचण : स्टेट बॅँकेचे सर्वाधिक ग्राहक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनधन योजनेच्या नावाखाली केंद्र सरकारने सत्तारुढ झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे बॅँक खाते उघडले. खाते उघडताना झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्यात आले. आता मात्र भारतीय स्टेट बॅँकेसारख्या मोठ्या बॅँकेत खात्यावर किमान ३००० रूपये रक्कम ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जनधन योजनेतील हजारों खातेधारकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.देशात व राज्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक लोक बॅँकींग क्षेत्राशी जुळलेले नाही. अनेकांचे बॅँक खाते नाही. त्यामुळे जनधन योजनेच्या नावाखाली बॅँकांना उद्दीष्ट देवून मोठ्या प्रमाणावर बॅँके खाते उघडण्यात आले. अनेक ठिकाणी बॅँकामार्फत व खाजगी संस्थांमार्फत शिबिर व मेळावे आयोजित करून जनधन योजनेत बॅँक खाते काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. नागरिकांना बॅँक खाते काढण्यासाठी कुठलेही पैसे लागणार नाही, असे सांगण्यात आले होते.झिरो बॅलेन्स अकाऊंट काढल्यानंतर नोटबंदीचा निर्णय झाला. त्यावेळी काही खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कमा जमा झाल्या होत्या. ही बाब समोर आल्यानंतर भारतीय स्टेट बॅँकेने खातेदाराच्या खात्यात किमान ३००० हजार रूपये मिनीमम बॅलेन्स ठेवावाच लागेल, असा नियम केला. त्यामुळे शेकडो खातेदार अडचणीत आले आहे.भारतीय स्टेट बॅँकेत अनेक निराधार, वृध्द, निवृत्ती वेतनधारक व शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांच्या खात्यावर महिन्याला एखाद्यावेळी रक्कम जमा होते. साधारणत: ५०० रूपये खात्यात ठेवून असे खातेदार इतर रक्कम काढून घेतात. मात्र आता ३००० हजाराची अट घालण्यात आल्याने या खातेदारांची मोठी अडचण झाली आहे. इतर राष्ट्रीयकृत बॅँकेमध्ये साधारणत: १५०० रूपयापासून मिनीमम रक्कम खात्यावर ठेवावी लागत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ज्येष्ठ नागरिक, निराधार, शेतकरी व पेंशनर यांच्यामध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. या नियमांची अंमलबजावणी केल्याने खातेदारांना भुर्दंड पडत आहे.नवीन नियमांचा ग्राहकांनाच मनस्तापशासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे नागरिकांना सुविधा होण्याऐवजी मनस्ताप अधिक सहन करावा लागत असल्याचे अनेकदा दिसून आले. सुरूवातीला खाते उघडताना कागदपत्राची अट शिथील करण्यात आली होती. कालांतराने ग्राहकांना पॅनकार्ड जोडणे अनिवार्य केले. तसेच आधार क्रमांक लिंक करताना ग्राहकांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागल्या. जनधन योजनेतील खातेधारकांना नवीन नियमामुळे त्रास होत आहे