शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

By admin | Updated: August 21, 2016 01:09 IST

जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

वर्धा तालुक्यात तीन नवे जि.प. गट उदयास : आष्टी व कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट कपातराजेश भोजेकर वर्धाजिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर हे बदल आगामी जि.प. व प.सं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. नव्या संररचनेनुसार वर्धा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकने वाढली असून ती ५१ वरुन ५२ करण्यात आली आहे. तर आष्टी आणि कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी करतानाच वर्धा तालुक्यातील गटांची संख्या ११ वरुन तब्बल १४ वर गेली आहे. स्वाभाविक, गणांची संख्या २२ वरुन २८ असणार आहे.नव्याने करण्यात आलेली ही गट व गणांची संरचना २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या निवडणुकासाठी असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या २९७ पंचायत समित्यांची मुदत सन २०१७ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहे. या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेवर आधारीत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १८ आॅगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९(१) नुसार जिल्हा परिषदेकरिता देय असलेली एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय विभागणी करणे, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा व त्यांचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व जमातीकरिता आरक्षित प्रभागासह) तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर करावयाचा असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. वर्धा जिल्हा परिषदेची संख्या ५१ वरुन वाढवून ५२ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू आणि समुद्रपूर या चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. तेथे नंतर निवडणूकाही घेण्यात आल्या. उल्लेखनीय, नगर पंचायत झालेल्या ग्रामपंचायती पूर्वी जि. प. गट होत्या. आगामी जि.प. निवडणुकीसाठी या गटांऐवजी नवे गट उदयास येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आष्टी व कारंजा हे गट कमी केले आहे. आष्टी तालुक्यातून चार ऐवजी तीनच आणि कारंजातून पाच ऐवजी चारच सदस्य जि.प.त जाणार आहे. १८ पैकी १४ पंचायत समिती सदस्यच निवडतील. परिणामी या तालुक्यातील विद्यमान जि.प. व पं.स. सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वर्धा तालुक्यात ११ ऐवजी आता १४ जि.प.सदस्य व २८ पं.स. निवडले जाईल. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी चालून आल्यामुळे अनेकांना जि.प. व पं.स. सदस्य पदाचे डोहाळे लागणार असल्याचे बोलले जात आहे.