शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मागणी वाढूनही दुधाचे भाव जुनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:25 IST

उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात.

ठळक मुद्देगोरस भंडारकडेही गर्दी। पाकीटबंद दुधालाही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. त्यामुळे दुधाला मोठी मागणी असते.जिल्ह्यात गोरसभंडारचे दूध हे ४० रुपये लिटर दराने विकले जाते. तर यापेक्षा कमी दरात नागरिक थेट ग्रामीण भागातील दूध विक्रेत्यांकडून खरेदी करतात. ग्रामीण भागातूनही शहराला मोठ्या प्रमाणावर दररोज दुधाचा पुरवठा होतो. राज्य सरकारच्या दूध योजनेसाठी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघ सध्या दररोज ८ हजार लिटर दुधाची खरेदी करीत आहे. जिल्हा दूध संघाला दूध खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली असल्याने यापेक्षा जास्त दूध खरेदी करता येता नाही. जिल्ह्याच्या आर्वी, कारंजा, आष्टी आदी भागात मदर डेअरी खरेदी करीत आहे. तर सेलू भागात काही ठिकाणी नागपूर येथील खासगी डेअरी दूध खरेदी आहे.दुधाची मागणी वाढली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरात २० ते ३० रुपयेच भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी मागणी वाढूनही त्रस्त आहेत. दूध उत्पादकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्या तुलनेत दुधाचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढत आहेत. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून त्यापासून आईस्क्रीम विकणारे लोक मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहे, असा दुग्ध उत्पादक शेतकºयांचा आरोप आहे.दूध उत्पादनाच्या भागात पाकीटावर बंदी घालाराज्यात ज्या भागात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, त्या भागात खासगी कंपन्यांच्या पाकीटबंद दुधाच्या विक्रीवर बंधने घालावी, ज्यामुळे शेतकºयाच्या दुधाला जादा भाव मिळेल आणि शेतकरी कुटुंबाला याचा लाभ होईल, अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. शेतकरी आरक्षणाच्या अष्टसूत्री कार्यक्रमात त्यांनी या बाबीचा उल्लेख केला आहे. ज्या भागात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागात पाकीटबंद दूध विक्री पूर्णपणे बंद करणे, सरकारची जबाबदारी आहे. मात्र, खासगी कंपन्यांच्या दबावात सरकार पाकीटबंद दुधाच्या विक्रीवर बंदी आणत नाही. त्यामुळे शेतकºयाच्या दुधाला भाव मिळण्यास अडचण निर्माण होते, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :milkदूध