उपाध्यक्षांना निवेदन : काँग्रेसकडून पदावरुन हटविण्याची मागणीवर्धा : लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेला शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करीत जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी आंदोलन केले. यावेळी त्यांनी शिक्षण सभापतींच्या कक्षासमोर असलेल्या नामफलकावर काळी शाई लावून निषेध नोंदविण्यात आला तर भेंडेंना पदावरून पायउतार करावे, या मागणीचे निवेदन उपाध्यक्ष विलास कांबळे यांना सादर केले. मिलिंद भेंडेंच्या शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून पूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षिकेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिने सेवाग्राम पोलिसात केली. या तक्रारीवरून भेंडेंना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. शिक्षण सभापती या पदावर असलेल्या या पदाधिकाऱ्याकडून झालेले हे कृत्य अशोभनीय आहे. यामुळे जिल्हा परिषदेची इभ्रत गेली आहे. एवढेच नाही तर लैगिक शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात गेलेल्या या लोकप्रतिनिधीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत लक्षावर विद्यार्थी आहेत. शिवाय महिला शिक्षकही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या सभापतीला पदावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जि.प.त गर्दी झाली होती.जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आालेल्या आंदोलनात जि.प. सदस्य मोरेश्वर खोडके, मोहन ग. शिदोडकर, संजय कामनापुरे, निलिमा दंढारे, गोपाल पा. कालोकार, ज्ञानेश्वर गो. ढगे, निर्मल बिजवे, गजानन निकम, गजानन गावंडे, बेबीताई साबळे, नंदकीशोर कंगाले, कुसुम गजभिये, मनोज चांदुरकर, अरूण उरकांदे, उज्वला सुरेश भगत, आशा ना. खेरडे, मारोतराव व्यवहारे सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)
मिलिंद भेंडेंंच्या नामफलकाला काळे फासले
By admin | Updated: February 10, 2016 02:35 IST