शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

वर-वधुला पुस्तक देत दिला ‘वाचाल तर वाचाल’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:51 IST

तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव्हे तर सदर लग्न सोहळा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणाराच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

ठळक मुद्देपढेगाव ग्रा.पं. चा उपक्रम : रुढी-परंपरेला फाटा देत पैशाची केली बचत

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव्हे तर सदर लग्न सोहळा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणाराच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.येथील शुभम सुधाकर पोटफोडे व अर्चना शंकर गायकवाड रा. कसारखेड (हिंगणगाव) येथील मुलगी ही दोन्ही कुटूंब अत्यंत गरीब असल्यामुळे लग्न सोहळ्याचा खर्च या दोन्ही कुटूंबांना न परवडनाराच होता. दरम्यान दोन्ही कुटूंबियांनी पहाडे यांची मदत घेत विचारपूस केली असता सदर कुटूंबांना योग्य मार्गदर्शन करून अत्यल्प खर्चात वधु-वरांचे लग्न लावून देण्यात आले. सदर लग्न सोहळा पढेगावच्या ग्रा. पं. कार्यालयाच्या आवारात पार पडला. नवदाम्पत्याला पुस्तक भेट देवून पुढील वाटचालीसाठी उपस्थित वरिष्ठांनी आर्शीवाद दिले. यावेळी वधु व वर पक्षाकडील कुटुंबियांनी रुढी व परंपारांना फाटा देत केवळ ऐरवी होणारा लग्नावरील मोठा खर्च टाळला. केवळी वधु-वरांनी एकमेकांना माल्यार्पण करून पुष्पगुच्छ दिले. पुस्तकाचे महत्त्व ओळखून ते भेट देण्यात आले.