शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटी साईटवर अपलोडचा गोंधळ; ओबीसी विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:06 IST

: महाराष्ट्र शासनाने शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून ८ लाख करण्याचा निर्णय १ जानेवारी २०१८ ला निगर्मित केला. परंतु हा निर्णय अद्याप महाडीबीटी साईटवर अपलोड न केल्यामुळे राज्यातील हजारो ओबीसी, एनटी, व्हिजे व एसबीसी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाने शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून ८ लाख करण्याचा निर्णय १ जानेवारी २०१८ ला निगर्मित केला. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. परंतु हा निर्णय अद्याप महाडीबीटी साईटवर अपलोड न केल्यामुळे राज्यातील हजारो ओबीसी, एनटी, व्हिजे व एसबीसी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.अजूनही जुन्याच शासन निर्णयाप्रमाणे फक्त ६ लाख उत्पन्न मर्यादेपर्यंतच्याच विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. विद्यार्थी व पालकांमध्ये शासनाविरूद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केंद्र शासनाप्रमाणे ८ लाख उत्पन्न मर्यादेचा नॉनक्रिमिलेअरचा शासन निर्णय आणि त्याच आधारे ८ लाख उत्पन्न मर्यादेचा शिक्षण शुल्क प्रतीपूर्ती उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय हिवाळी अधिवेशनात घ्यावा म्हणून महाअधिवेशन नागपूर येथे आयोजित केले होते.त्यानंतर शासनाने १६ डिसेंबर २०१७ ला ८ लाख उत्पन्न मर्यादेचा क्रिमिलेअरचा जीआर आणि १ जानेवारी २०१८ रोजी शिक्षण शुल्क प्रतीपूर्तीचा शासन निर्णय निर्गमित केला. परंतु, ८ लाख उत्पन्न मर्यादेचा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा शासन निर्णय महाडीबीटीच्या संकेत स्थळावर अद्याप अपलोड न केल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देवून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी ओबीसी संघटनांची मागणी आहे.महाडीबीटी वेबसाईट अपलोड करावी आणि या संदर्भात हयगय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.- प्रा. शेषराव येलेकरउपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

टॅग्स :Governmentसरकार