शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पारा ९.०१ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:23 IST

नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला.

ठळक मुद्देजिल्ह्यात गारठा वाढला : उत्तरेकडील वारे सक्रिय

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला. उत्तर भारतात बर्फवृष्टीला प्रारंभ होताच विदर्भ प्रांतात थंडीला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी वर्तविला आहे.बुधवारी सकाळी वर्धेत ९.०१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी रात्रीचे तापमान १२.०१ अंश होते. मागील ३ ते ४ दिवसांपासून तापमानात घट होत असल्याचे नोंदीवरून दिसून येते. यापूर्वी जिल्ह्यात हिवाळ्यामध्ये किमान तापमान ५.८ अंशांपर्यंत नोंदविले गेले आहे. यंदा सर्वात कमी तापमान बुधवारी सकाळी नोंदविण्यात आले. दिवाळीनंतर थंडी सुरू होत असे; पण काही वर्षांपासून थंडीला नोव्हेंबर अखेर सुरूवात होत आहे. थंडीचा कडाका सुरू होताच शहरातील वर्दळही रात्रीनंतर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी आलेल्या ओखी वादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडत होते. परिणामी, विदर्भ प्रांतातील थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे दिसून येत होते. आता वातावरणातील हा अडथळा दूर झाल्याने थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय पारा यापेक्षाही खाली जाण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घटउत्तर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे एकाएकी तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान १२.२ अंश सेल्सीयस होते. बुधवारी सकाळी हाच पारा ३ अंशांनी खाली उतरला. आजचे सकाळचे किमान तापमान ९.०१ अंश सेल्सीयस नोंदविले, अशी माहिती हवामानाचे अभ्यासक नितीन डोंगरे यांनी दिली.शेतीसाठी पोषकशेतीकरिता सध्याची थंडी पोषक आहे. विशेषत: रबी हंमागातील गहू आणि चणा पिकांना हा गारठा उपयुक्त आहे. यामुळे सध्या सुरू झालेल्या थंडीच्या कडाक्याचा परिणाम शेतीवर होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.