शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या मनमर्जीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:30 IST

तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देदेवळीतील प्रकार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.शेतकऱ्यांचा कापूस उधारीत न घेणे हे क्रमप्राप्त असताना देवळीच्या उप बाजार समितीत व्यापारी चक्क उधारीत कापूस खरेदी करीत असल्याचे दिसते. याकडे कृउबासच्या सभापतींसह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उधारीत कापूस खरेदी करून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच झाल्याचा प्रकार यापूर्वी सेलू येथे घडला आहे. त्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारे कापूस उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांकडून नाडल्या जावू नये यासाठी संबंधित यंत्रणेने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. देवळी उप बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणारे काही व्यापारी थेट कापूस उधारीत खरेदी करीत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून काही शेतकऱ्यांना चार दिवसानंतरचा तर काहींना तब्बल सुमारे १० दिवसानंतर धनादेशाद्वारे कापसाचा चुकारा दिल्या जात आहे. त्यामुळे उन्हाळवाहीच्या कामांना गती देणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी व्यापाºयांकडून केली जात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.शेतकºयांना कापूस विक्री केल्यानंतर पैशाची नितांत गरज असताना त्यांना पैशासाठी १० ते १२ दिवस थांबावे लागत आहे. इतकेच नव्हे तर कापसाची गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल १० रुपये रोख स्वरूपात घेतली जात आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणा व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच कापूस विक्रीकरिता आणल्यावर हा कापूस फरतड असल्याचे सांगत कापसालाही अल्प दर दिल्या जात आहे. हा संपूर्ण प्रकार पूर्वीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा असल्याने याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली प्रती क्विंटल १० रूपयेदेवळीच्या बाजार समितीत कापूस विक्री करीता नेल्यावर शेतकऱ्यांकडून कापूस भरलेली गाडी रिकामी करण्याच्या नावाखाली प्रती क्विंटल १० रुपये घेतले जात आहे. परंतु, घेण्यात येणाऱ्या या पैशाची कुठलीही पावती शेतकºयांना दिली जात नाही. त्यामुळे हा पैसा कुणाच्या खशात जात आहे याबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.शासकीय तूर खरेदीही कासवगतीनेचदेवळीच्या बाजार समितीच्या आवारात शासकीय तूर खरेदीही सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आतापर्यंत केवळ ४३५ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक तूर उत्पादकाच्या शेतमालाला शेतमाल विकतेवेळी योग्य भाव मिळावा यासाठी संबंधित यंत्रणेणे प्रयत्न करावे, अशी तूर उत्पादकांची मागणी आहे.बाजार समितीत हमालांकरवी शासकीय धोरणानुसार शेतकऱ्यांकडून कापूस रिकामा करण्यासाठी प्रती क्विंटल १० रुपये घेत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कापसाचा चुकारा २४ तासाच्या आत देणे क्रमप्राप्त आहे. मार्च महिना राहिल्याने गत महिन्यात धनादेशाद्वारे कापसाचा चुकारा देण्यात विलंब झाला असावा. आतापर्यंत आपल्याकडे कुठल्याही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल.- मनोहर खडसे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.

टॅग्स :cottonकापूस