वर्धा : सायकोसीस, उदासीनता, चिंता, मतिमंदत्व, व्यसनाधिनता व अपस्मार हे आजार असलेल्या व्यक्तींपर्यंत मानसिक आरोग्य पोहोचविण्याकरिता मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे उद्घाटन १० आॅक्टोबर मानसिक आरोग्य दिनी मनोरुग्ण महिला पुनर्वसन केंद्र दत्तपूर येथे करण्यात आले. यावेळी मनोरुग्ण महिलांचे समुपदेशन करून त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. समस्या जाणून घेत औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या सप्ताहांतर्गत शिबिर, ग्रामसभा तसेच चावडी वाचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या अपंग प्रमाणपत्र शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय पातळीवर रुग्ण तपासणी केली जात असून हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यासत राबविला जात आहे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे घोषवाक्य ‘डिग्निटी इन मेनटल हेल्थ’ हे आहे. याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने शारीरिकसह मानसिक आरोग्याशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. मानसोपचार तज्ञाद्वारे उपचार, समुपदेशन, मानसशास्त्रीय चाचण्या, बुध्यांक तपासणी, मोफत औषधोपचार, मनोरुग्ण आकडी, व्यसनधिनता समुपदेशन व औषधोपचार, मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे गावस्तरावर मानसोपचार सेवा, आत्महत्या प्रतिबंधक कक्ष, शेतकरी मित्र कक्ष आदी उपक्रम ग्रामसभा व चावडी वाचन अंतर्गत राबविण्यात आले. मतिमंद व गतिमंद व्यक्ती, कुटुंबियांना समुपदेशन, लैंगिक, वैवाहिक तथा कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन, ताण-तणाव व्यवस्थापन, शैक्षणिक समस्या समुपदेशन आदी प्रकारच्या सेवाही उपलब्ध आहेत. गरजुंनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले. सप्ताहाला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती सोनोने, सुजाता पारेकर, कुंदा बिडकर, जयश्री गाठे, पुष्पलता पाटील, चारूशिला कडू, रिता थूल, वाहाने, वाघमारे, कठाणे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
मानसिक आरोग्य सप्ताह; मनोरुग्ण महिलांचे समुपदेशन
By admin | Updated: October 18, 2015 02:32 IST