शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

आरोग्यविज्ञान प्रदर्शनातून कलामांच्या स्मृतींना उजाळा

By admin | Updated: September 21, 2015 02:06 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या गणेशोत्सवातील सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आरोग्य, ज्ञानविज्ञान, मनोरंजन यावर आधारित प्रदर्शन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना.....

गणेशोत्सवातील उपक्रम : आरोग्यविषयक सुविधांची दिली माहितीवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या गणेशोत्सवातील सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आरोग्य, ज्ञानविज्ञान, मनोरंजन यावर आधारित प्रदर्शन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करणारे ठरले आहे. ‘मिशन २०२० आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे स्वागतद्वार क्षेपणास्त्राच्या आकाराचे करण्यात आले असून प्रदर्शनाच्या बाहेरील भिंतीवर डॉ. कलाम यांच्या प्रेरक विचारांना या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलपती दत्ता मेघे, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, ज्येष्ठ समाजसेवी मोहन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ. श्याम भुतडा, प्राचार्य बी.डी. कुळकर्णी, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, गणेश खारोडे, शशांक शर्मा, सामुदायिक औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अभय मुडे, डॉ. वसंत वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात सावंगी (मेघे) येथील ग्रामीण रुग्णालयातील वर्तमानकालीन आरोग्यविषयक सुविधा व योजना यांची माहिती सर्वसामान्यांना देण्यात आली असून सन २०२० पर्यंत करावयाची आरोग्यमय वाटचाल मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, नर्सिंग, सामुदायिक औषधी विभाग अशा विविध विभागांतील आरोग्यसेवांसोबत यात आधुनिक तंत्रज्ञान, उपचार यंत्रणा, आरोग्यविषयक योजना, आयुर्वेदिक उत्पादने आदी अनेक बाबी आकर्षक व आधुनिक पध्दतीने मांडण्यात आल्या आहे. हे प्रदर्शन २७ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी नागरिकांकरिता खुले असणार आहे. या आयोजनात प्रशासकीय अधिकारी शर्मिला परिहार, रुग्णसंपर्क अधिकारी एन.पी. शिंगणे, डॉ. बडवाईक, डॉ. खोब्रागडे, डॉ. मनीष शर्मा, श्रावणी देवलिया, अजय ठाकरे, अहमिंद्र जैन, रिना सलुजा, वसंत वासे, सुलोचना मोहोड, जितेंद्र आगलावे, छाया बोबडे, किशोर खोंड आदींचे सहकार्य मिळत आहे. येथील गणेश उत्सव जिल्ह्यातील नागरिकांकरिता आकर्षणाचा विषय असतो. येथे काळात हजारो नागरिक भेत देतात. या पाशर््वभूमीवर या गणेश उत्सव काळात विशेष आरोग्य सेवांबाबत विस्तृत माहिती नागरिकांना या प्रदर्शनातून देण्यात येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी) सांस्कृतिक कार्यक्रम ‘मिशन २०२० आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनातून माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोग्यविज्ञान या विषयावर ही संपूर्ण प्रदर्शन आधारित आहे. गणेश उत्सव काळात येथे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक भेट देतात. येथील गणेश उत्सवाचे नेहमीच आकर्षण जिल्ह्यातील नागरिकांना असते. हीच बाब हेरून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांची माहिती देऊन त्यांच्यात आरिग्याप्रती जागरूक करण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे.