शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘स्मृतिगंध’ने सुरेल आठवणींना उजाळा, रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:55 IST

वर्ध्याच्या साहित्य व कलाक्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य जयंत मादुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिगंध’ या सुश्राव्य व देखण्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल तीन तास चाललेल्या या दर्जेदार व अभिनव अशा दृकश्राव्य कार्यक्रमाला वर्धेकरांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.

ठळक मुद्देजयंत मादुस्कर स्मृतिप्रीत्यर्थ दृकश्राव्य मैफल : सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याच्या साहित्य व कलाक्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य जयंत मादुस्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘स्मृतिगंध’ या सुश्राव्य व देखण्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तब्बल तीन तास चाललेल्या या दर्जेदार व अभिनव अशा दृकश्राव्य कार्यक्रमाला वर्धेकरांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय, संस्कार भारती आणि मादुस्कर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात ‘वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य वंदे मातरम्’ या गीताने करीत पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यापाठोपाठ जयंत मादुस्कर यांच्या स्वरातील ‘दूध नको पाजू हरीला’ हे गीत दुर्मिळ छायाचित्रांसह मोठ्या एलईएडी पडद्यावर सादर करण्यात आले.या गीतांचा मागोवा घेत अनघा रानडे, नितीन वाघ, अरूण सुरजूसे, केतकी कुळकर्णी, कवीनेसन, सुनील रहाटे व डॉ. भैरवी काळे या गायकगायिकांच्या सुमधुर स्वरांची जिंदादिल मैफल सुरू झाली. ‘माझ्या प्रितीफुला, जीवनात ही घडी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, स्वर आले दुरुनी, तोच चंद्रमा नभात, अशी पाखरे येती, हृदयी प्रीत जागते, जीवलगा कधी रे येथील तू, तुझ्या गळा माझ्या गळा, चंद्र आहे साक्षीला, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, राजा ललकारी अशी दे, गोमू माहेरला जाते हो नाखवा, सखी मंद झाल्या तारका, फिरूनी नवे जन्मेन मी, नवीन चंद्रमा, येगं येगं निद्राराणी, माधवा युध्द कशाला करू, कानडा राजा पंढरीचा’ अशा सरस भावगीत व भक्तिगीतांच्या स्वरधारेत रसिक अक्षरश: न्हाऊन निघाले. अस्सल मराठी बाज जोपासत ‘दूर व्हा जाऊ द्या, बुगडी माझी सांडली गं आणि बाई माझी करंगळी मोडली’ या ठसकेदार लावण्यांचा मेडलेही मैफलीत सादर झाला. जयंत मादुस्करांनी संगीतबध्द केलेल्या कवी अनंत भीमनवारांच्या ‘छप्पर भिंती खडू फळ्याविन अशी असावी, तारावरी पारावरी पाखरांची शाळा, ऋतुंना विचारू या गं ऋतुसंगे बोलू’ या रचनाही चोखंदळ रसिकांची दाद मिळवून गेल्या. तर गदिमा आणि सुधीर फडके यांच्या स्मृतींना उजाळा देत गीतरामायणातील तेरा अवीट रचना सलग सादर करून गायकांनी संपूर्ण वातावरणच भक्तिमय केले.या मैफलीत गायकांना सुरमणी वसंत जळीत (व्हायोलिन), नरेंद्र माहुलकर (संवादिनी), रवी खंडारे (बासरी), प्रवीण चहारे (सिंथेसायझर), मंगेश परसोडकर, अनिल दाऊतखानी (तबला) आणि राजेंद्र झाडे (आॅक्टोपॅड) यांची सुरेल साथ लाभली. अ‍ॅड. अजित सदावर्ते यांचे मोजक्या शब्दांतील निवेदन या मैफलीसाठी साजेसे व समर्पक असेच होेते.या कार्यक्रमात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त, गौतम बजाज, साहित्यिक डॉ. सुनीता कावळे, प्रा. सरोज देशमुख, शालिनी मादुस्कर, डॉ. आनंद सुभेदार, शंकरप्रसाद अग्निहोत्री, संगीततज्ज्ञ प्रा. डॉ. श्याम गुंडावार, प्रा. विकास काळे, प्रदीप बजाज, गौरीशंकर टिबडेवाल, प्रा. रा.मो. बैंदूर, सतीश बावसे, संजय इंगळे तिगावकर, सुनीता लुले, गोडबोले, शीला पांडे, विलास कुळकर्णी, शंकर गोंधळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंत मादुस्कर यांच्या स्मृतींना उजाळा देणारी संवादी क्षणचित्रे चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाची ध्वनी व प्रकाश योजना प्रशांत कोल्हे यांनी सांभाळली. तर चित्रफितींचे दृश्य संपादन भूषणप्रसाद कावळे व दिलीप मादुस्कर यांनी केले.नियोजित वेळी सुरू झालेल्या या दर्जेदार कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संयोजक दिलीप अरूण मादुस्कर, सुप्रिया मादुस्कर, मकरंद उमाळकर, अनिल पाखोडे, डॉ. माधुरी काळे, वसंत देशपांडे, मिलिंद जोशी, प्रफुल्ल व्यास, पंकज घुशे, नरेंद्र नरोटे, राहुल तेलरांधे, प्रसाद देशपांडे यांच्यासह स्मृतिगंध समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.