शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य, ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:01 IST

आपल्या गावातील ग्रामपंचायत म्हणजे विकासात्मक तसेच प्रशासनिक कामकाजाकरिता सामान्य जनतेचा आधार आहे. सदस्य व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाके आहेत. सरपंच त्या रथाचा सारथी आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : नेरी पुनर्वसन येथे ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपल्या गावातील ग्रामपंचायत म्हणजे विकासात्मक तसेच प्रशासनिक कामकाजाकरिता सामान्य जनतेचा आधार आहे. सदस्य व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या रथाची दोन चाके आहेत. सरपंच त्या रथाचा सारथी आहे. गावाचा विकास करावयाचा असेल तर ग्रामपंचायतरूपी रथ योग्य रीतीने चालणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी झालेली असून लोकार्पण होत आहे, ही अभिमानास्पद बाब असून सर्व जनतेनी ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी नेरी पुनर्वसन (सालोड) येथे ग्रामपंचायतीच्या लोकार्पणप्रसंगी व्यक्त केले. नेरी पुनर्वसन येथे जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेरी पुनर्वसनचे सरपंच धनराज टुले, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, लोकलेखा समितीचे सदस्य जयंत कावळे, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, पंचायत समिती सदस्य साविता मुते, सालोडचे सरपंच नानाजी देशमुख, रामकृष्ण मिरगे, गिरीश कांबळे, उपसरपंच सविता कस्तुरे, सचिव बी. डी. कांबळे उपस्थित होते.खासदार तडस म्हणाले, केंद्र व राज्य सरकार विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत आहे. समग्र ग्रामीण विकास हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच ग्रामीण भागात सुविधा राबवून ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत. त्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी शिवनेरी स्पोर्टिंग क्लबद्वारा आयोजित ५८ किलो वजनगटातील कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, सावंगीचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, रामकृष्ण मिरगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच धनराज टुले तर संचालन चंद्रशेखर चाफले यांनी. उपस्थितांचे आभार स्वप्नील कठाणे यांनी मानले.कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य धीरज भगत, सदस्य देवराव क्षीरसागर, सदस्या, ममता मिरगे, सदस्य मंदा चाफले, सदस्य शांता क्षीरसागर, हरीश तडस यांच्यासह इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.