शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाना विषयांच्या कवितांनी गाजले संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:51 IST

संकल्प साहित्य परिषदेच्यावतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. मनोहर फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी वसंतराव करोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंकल्प साहित्य परिषदेचा कार्यक्रम : देशभक्तीसह स्त्री, शेतकऱ्यांवर सादर झाल्या कविता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संकल्प साहित्य परिषदेच्यावतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. मनोहर फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी वसंतराव करोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रथम पुष्प रामदास भोमले यांच्या काव्य गायनाने गुंफले तर स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्यांच्या आठवणींना उजाळा देत भालचंद्र डंभेच्या ओळी, ‘गेल कोणाचवं कुंकु, गेली मायची गा कुस, कुठ हरवला भाऊ पोरं मुकले बापास’ अशा शब्दांत बलिदान केलेल्याचे स्मरण करून दिले. तर अ‍ॅड. फुलमाळी यांनी ‘हम सब इस देश के वासी, सबका है यह हिंदुस्थान’ अशा धारदास शब्दांत आपल्या देशाची महती गायली. त्यानंतर स्वातंत्र्य देशात कामगाराचे प्रश्न, गर्दीवद्री दरी धुंडून रायलो आम्ही, नोका देवू पुरी अर्धिच मागून रायलो आम्ही, ही संजय भगतची कविता विचार करण्यास प्रवृत्त करून गेली. अ‍ॅड. भाष्कर नेवारे यांची गोंदन कविता ‘ प्रा. मनोहर चिचपाणे पुर्वीचा काळ’ या कविता सादर झाल्यात.डॉ. भीमराव भोयर यांची माझ्या गावाच वैभव तर वामनराव लांडगे यांचे सत्य बोलने सोडू नको’ या वैभवशाली कवितांनी बहारदार रंग चढविला. वसंतराव करोडें यांची उलंगवाडी पावसाला साकडे घालत होती. कमलेश पाटील यांनी कलंक कवितेने देशातील दंगलीचा, विजय भगत यांची शिकारी तर मोरेश्वर सहारे यांचे स्वातंत्र्य तू जन्मलात तेव्हा या कवितेने देशातील घडामोडींना जनतेसमोर आणले. या प्रश्नांचा समोराकरीत स्त्री असावी अशी या सुषमा ढाले यांनी स्त्री शक्तीची जाणीव करून दिली. प्रा. प्रमोद नारायणे यांनी स्वातंत्र्याला प्रश्न विचारला तर सुरेश सत्यकार यांनी ‘इस देश की रक्षा करलो, जहा टिके रहे आझादी’ असा मोलाचा सल्ला दिला. प्रा. अशोक गावंडे यांनी वंदन या कवितेतून या देशाला, मातृभूमीका व समस्त नागरिकांना वंदन केले.