शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हक्क परिषदेसाठी सभा

By admin | Updated: April 13, 2017 01:47 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी

वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने १६ एप्रिल ला लोक महाविद्यालय, वर्धा येथे दुपारी १२ वाजता आयोजित या परिषदेची माहिती देण्यासाठी विश्रामभवन येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, रामराव मुडे, वसंता मुजबैले, हेमकांत वरटकर, समीर महाकाळकर, अरविंद थूल, पांडूरंग येळणे, डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. घाम व रक्त गाळून पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवून, शेतकरी व त्याची तरणीताठी पोरं आत्महत्या करीत आहे. विद्यमान सरकार कुणालाही न जुमानता शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नवनगर निर्मितीच्या नावावर लँडपूलींग करुन फुकटात जमिनी हडपत आहे. या सरकारच्या काळात दोन वर्षात आजपर्यंत ९ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, त्यामुळे ही परिषद घेण्यात येणार असून या समस्यांना वाचा फोडायची आहे, अशी माहिती प्रा. गमे, अ‍ॅड. धोटे यांनी दिली. महात्मा फुले समता परिषदेच्या या शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे दीड भावाचा किमान हमीभावाचा कायदा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमी संपादनत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला प्रवीण धलवार, अशोक येंगडे, राजेंद्र ठोंबरे, इंद्रपाल गायकवाड आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)