शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात उपाययोजनांचा दुष्काळ

By admin | Updated: May 25, 2017 01:06 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात विक्री जोरात : कारवाई करणारेही घेतात बघ्याची भूमिका लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे. मात्र, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या उपाययोजनांचा दुष्काळ दारूबंदीच्या जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लहान गावातही अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. लग्नसराईचा मोसम सध्या सुरू असल्याने दारूची विक्रीही मुबलक प्रमाणात वाढली आहे. राज्यात सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये गडचिरोली जिल्हा दारूबंदी करण्यात आला. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करताना वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या दोन जिल्ह्यात अंमलबजावणीत राहिलेल्या उणीवा शोधण्यात आल्या व त्यावर उपाय योजना करून चंद्रपूरच्या दारूबंदीला मुहूर्तरूप देण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने या तिन जिल्ह्याच्या दारूबंदी झोनसाठी फारशा उपाययोजना केल्या नाहीत. दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेपासून २५ कि.मी. अंतरावरचे दुकान बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांची पूर्तता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रमाणात झाली; पण आता पुन्हा रस्त्याचे मालकी हक्क बदलवून हे दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात फिरत्या प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सुरू केल्या जाणार होत्या. केवळ चंद्रपूर जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा निर्माण केली जात आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून सरकारजमा करण्याची कारवाई गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली. मात्र, वर्धेत अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक गावात दारूबंदीच्या विरूद्ध कमेटी तयार करण्याच्या शासन निर्णयावर ही अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. एकूणच अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग कमी पडत आहे.गांधी विनोबांच्या गावातही दारूचा महापूरमहात्मा गांधी याची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू उपलब्ध होत आहे. अनेक ठिकाणी दारूच्या शिश्या पडलेल्या दिसून येत आहे. तसेच वर्धा शहरातही अनेक शासकीय कार्यालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच पडलेला दिसून येतो. विनोबा भावे यांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पवनार गावात नदीच्या किनाऱ्यावरच गावठी दारूच्या भट्या सुरू आहेत. त्यामुळे पवनार हे गाव गावठी दारू विक्रीचे मुख्य केंद्र झाले आहे.