शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

‘मायेची शिदोरी’मध्ये गरजूंना पाच रुपयांत जेवण

By admin | Updated: January 16, 2017 00:41 IST

अनेक गरजुंना दोन घास अन्नासाठी वणवण भटकावे लागते. रुग्णांसोबत वा कामानिमित्त वर्धा सारख्या शहरात

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ : विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम वर्धा : अनेक गरजुंना दोन घास अन्नासाठी वणवण भटकावे लागते. रुग्णांसोबत वा कामानिमित्त वर्धा सारख्या शहरात येणाऱ्यांना अल्पोपहार वा पाण्यावर दिवस काढावा लागतो. या गरजुंना आता केवळ पाच रुपयांत भरपेट जेवण मिळेल. यासाठी ‘मायेचा कोपरा’ अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रम शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनांनी सुरू केला. रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील काही शासकीय कार्यालये तथा सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन सामान्य रुग्णालयात वैद्यकीय जनजागृती मंचाच्या पुढाकाराने ‘मायेचा कोपरा’ सुरू केला. तेथे गरजूंकरिता कापड, चप्पल, जोडे आदी साहित्य उपलब्ध करण्यात आले. त्याचा अनेक गरजुंनी लाभ घेण्यास सुरुवात केली. यात पुढचे एक सेवाभावी पाऊल उचलत ‘मायेची शिदोरी’ हा उपक्रमही सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाच रुपयांच्या ‘कुपण’वर पोटभर जेवण दिले जाणार आहे. शुभारंभप्रसंगी रविवारी काही गरजुंना भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वर्धा सोशल फोरमचे अभ्यूदय मेघे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, सतीश बावसे यांच्यासह उपक्रमात सहभागी कार्यालयांचे प्रमुख, संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी) उपक्रमात २१ संस्थांचा सहभाग जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य रुग्णालय, वैद्यकीय जनजागृती मंच, रोटरी क्लब, जनहित मंच, आगाज युवा बहुउद्देशीय संस्था, श्रमिक पत्रकार संघ, वर्धा सोशल फोरम, नॅशनल युथ युनियन आॅफ इंडिया, लॉयन्स क्लब, युवा महाशक्ती, वीर भगतसिंग ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सेलू, शिवगर्जना ढोल-ताशा पथक, वर्धा हॉटेल्स असोसिएशन, माहेश्वरी नवयुवक मंडळ, आधारवड, भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिपे्रझेंटेटीव्ह असोसिएशन, वर्धा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन व अरहम आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. येथे मिळतील कुपण या सेवेचा लाभ घेण्यासाठी पाच रुपयांचे कुपण दिले जाणार आहे. सामान्य रुग्णालय तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील विविधा सेतू केंद्रात मायेची शिदोरीचे कुपण गरजूंना मिळेल.