शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मायेच्या कोपऱ्यातून एक हजारांवर गरजूंना मिळाली ‘मायेची शिदोरी’

By admin | Updated: April 17, 2017 00:39 IST

शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त गावखेड्यातून दररोज असंख्य लोक येतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे

दोन घास पोटासाठी : शहरात कामानिमित्त येणाऱ्यांना दिलासा; अनेक दानदात्यांकडून आधार प्रशांत हेलोंडे   वर्धा शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामानिमित्त गावखेड्यातून दररोज असंख्य लोक येतात. यामध्ये अनेकांची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे ते पोटाला चिमटा देत दिवसभर आपली कामे करतात. काम झाले तर चेहऱ्यावर आनंद आणि नाही झाले, तर निराश होऊन परत जातात. दरम्यान, खिशात जेमतेच दमडी असल्यामुळे नाश्ता, तर दूरच चहासुद्धा विकत घेऊ शकत नाही, अशा गरजूंसाठी शहरातील डॉक्टर मंडळींनी ‘मायेचा कोपरा/मायेची शिदोरी’ हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. गत दोन महिन्यांत या उपक्रमामुळे तब्बल एक हजारावर लोेकांच्या पोटात अन्नाचे दोन घास पडले. यामुळे त्यांचे काम झाले नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाने भाव बघायला मिळत आहे. वैद्यकीय जनजागृती मंच या वर्धा शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातून मायेचा कोपरा या नावाने मायेची शिदोरी या उपक्रमाला प्रारंभ झाला. येथे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या मायेच्या शिदोरीने चांगलाच दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम सुरू झाला. त्यांना हा उपक्रम भावुक करणारा ठरला. यानंतर त्यांनी शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी विविधा केंद्रात हा उपक्रम सुरु केला. मात्र येथील जबाबदारी संबंधितांनी बरोबर पार न पाडल्यामुळे काही अंतरावरील गांधी चौकातील पांगुळ कॅन्टीनवर ही जबाबदारी सोपविली. या उपक्रमाचे महत्त्व वाढत गेले. आजघडीला तब्बल नऊ ठिकाणी मायेचा कोपरा कामानिमित्त आलेल्या गरीबांची भूक क्षमविणारी शिदोरी देत आहे. मागील दोन महिन्यात तब्बल एका हजारांवर गरजूंनी या शिदोरीचा आस्वाद घेतला. सामान्य रुग्णालयातील केंद्रातून ७७२ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. उपक्रमाला २२ संघटनांचा हातभार वैद्यकीय जनजागृती मंचने सुरू केलेल्या या उपक्रमाला आता तब्बल शहरातील जिल्हा प्रशासनासह तबल २२ सामाजिक संघटना आणि सामाजिक दायित्त्वाचा भाग म्हणून काही दानशूरही हातभार लावत असल्याचे दिसते आहे. ही मंडळी दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करुन हा उपक्रम सुरळीत चालवित आहे. ही सहकार्यासाठी पुढे येणाऱ्या संघटनांची संख्या वाढीवर आहे. स्वाभिमानाची शिदोरी शहरात ‘मायेचा कोपरा’ या नावाने गरीबांना मायेची शिदोरी उपलब्ध करुन दिली जात आहे. ही शिदोरी देण्याचे प्रयोजन होते. मात्र समाजात गरीबी असली तरी ते स्वाभीमानाने जगतात. त्यांना फुकट घेण्यास ते कचरतात. असा अनुभव काही केंद्रावर आला. एका दाम्पत्याने फुकट कुपण घेण्यास नकार दिला. तेव्हापासून गरीबांचा स्वाभीमान जपण्यासाठी पाच रुपयात हे कुपण उपलब्ध करुन दिले जात आहे.