शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:47 IST

विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचा मानस : भाविकांना मिळणार सुविधा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांतील एकूण २७२ बसेसपैकी जास्तीत जास्त २५० बसेसचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्या वर्धा जिल्ह्यातील विविध भागांसह जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात. तसेच काही बसेस वर्धा होत पंढरपूरच्या दिशेने नेहमीच सोडल्या जातात. परंतु, आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी राहात असल्याने त्यांना सुविधा व्हावी या दृष्टीने या काळात रापम विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करते. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा विभागाकडून सुमारे ५० बसेस पंढरपूरला पाठविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तर मागील वर्षी ही संख्या ४४ च्या घरात होती. तेव्हा बºयापैकी उत्पन्न रापमच्या वर्धा विभागाला झाल्याचे सांगण्यात आले.प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत घेतली जाणार दक्षतारापमच्या वर्धा विभागाकडे एकूण २७२ बसेस आहेत. त्यापैकी २५० बसेसचे नियोजन जिल्ह्यातील पाच आगारातून करून त्या बसेस विविध गावांच्या दिशेने पाठविल्या जातात. तब्बल ५० बसेस पंढरपूरला पाठविताना कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेत काही बसफेºया रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.६० टक्क्यांवर मिळते भारमानमागीलवर्षी ४४ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पंढरपूरला सोडण्याचा मानस रापमच्या वर्धा विभागाचा आहे. त्या दृष्टीने सध्या पाऊलही पडत आहेत. मागीलवर्षी पंढरपूरसाठी सोडण्यात आलेल्या बसेसला ६० टक्क्यांवर भारमान मिळाले होते. तर यंदाही ६० टक्क्यांवर भारमान मिळेल, अशी अपेक्षा रापमच्या अधिकाºयांना आहे.सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहक व चालकांवर होणार कारवाईआषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला पाठविण्यात येणाºया बसेसमध्ये वाहक व चालक राहणार आहेत. त्यांनी काय करावे, याबाबतच्या सूचना त्यांना वरिष्ठांकडून पूर्वीच देण्यात येणार आहे. मात्र, रापमचा जो कर्मचारी या सूचनांना पाठ दाखवेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी पाठविल्या ४४ बसेसआषाढी एकादशीचे औचित्य साधून अनेक भाविक पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जातात. त्यात वर्धा जिल्ह्यातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मागीलवर्षी तब्बल ४४ बसेस रापमच्या वर्धा विभागाने भाविकांना सुविधा होईल या हेतूने पंढरपूरला पाठविल्या होत्या.आषाढी एकादशीनिमित्त मागीलवर्षी ४४ बसेस पंढरपूरला पाठविल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पाठविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच्या नियोजनाला अंतिम रूप सध्या दिले जात आहे.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रापम वर्धा.