शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
8
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
9
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
10
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
11
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
12
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
13
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
14
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
15
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
16
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
17
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
18
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
19
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
20
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

मतविभाजनाने बिघडले दिग्गजांचे गणित

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू तालुक्यातील मतांवरच होता. त्यांनी घेतलेल्या मतांमध्ये बहुतांश मते सेलू तालुक्यातील आहे. याचा फटका शेखर शेंडे यांना बसला. आर्वीत अमर काळे हे केवळ ३ हजार १४३ मतांनी विजयी झाले. येथे भाजपाचे दादाराव केचे निवडून येतील असे चित्र होते. मात्र गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे या निवडणुकीत मैदानात होते. यामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाल्याने दादाराव केचे यांना त्याची मोठी किमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे यांनी ३ हजार ८६१ मते घेतली. शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी २ हजार १७४ मते घेतली, तर बाळा जगताप यांनी ३ हजार ६४२ मते घेतल्याने भाजपचे गणित बिघडवले.हिंगणघाटात समीर कुणावार यांना आमदार करायचे हे आधीच हिंगणघाटातील मतदारांनी ठरवले होते. असले तरी दिग्गज तिसऱ्या व चवथ्या क्रमांकावर फेकले जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. या निवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि मनसेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मनसुबे पार धुळीस मिळविले.देवळीत तोंडचा घास गेलादेवळीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांचा निसटता विजय झाला. त्यामागेही मतांचे विभाजन हेच कारण आहे. बसपाचे उमेश म्हैसकर यांच्या मतांवर काँग्रेसची भिस्त होती. म्हैसकर यांनी तिसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे काँग्रेसला विजयासाठी शेवटच्या फेरीत चमत्कार घडवावा लागला. यात राकाँचे शशांक घोडमारे यांना ६ हजार ३४३ मते घेऊन भरच टाकली. त्यातच शिवसेनेचे डॉ. निलेश गुल्हाणे यांची उमेदवारी नसती तर भाजपाचे सुरेश वाघमारे यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावता आला नसता.