शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: July 17, 2015 02:13 IST

रस्त्याने जात असलेल्या युवतीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना विजयगोपाल येथे गुरुवारी उघड झाली.

युवती रुग्णालयात : पुलगाव पोलिसात गुन्ह्याची नोंदविजयगोपाल : रस्त्याने जात असलेल्या युवतीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना विजयगोपाल येथे गुरुवारी उघड झाली. यात सदर मुलीची प्रकृती खालावल्याने तिला भिडीच्या आरोग्य केंद्राच्या बाहेर सोडण्यात आले. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून दुचाकीसह दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील पीडित युवती बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरून मलातपूर येथे जाण्याकरिता निघाली. दरम्यान तिच्या ओळखीचे दोन युवक भेटले. त्यांच्या दुचाकीवर बसून ती गेली. या दोघांनी तिला दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर आळीपाळीने अतिप्रसंग केला. यात तिची प्रकृती खालावल्याने दोघांनाही तिला दुचाकीवर आणत रात्री १० वाजताच्या सुमारास भिडी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सोडून ते पसार झाल्याचे युवतीने पोलिसांना सांगितले. घरुन गेलेली मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या आईने सर्वत्र शोधाशोध सुरू केला. त्याचवेळेस त्या मुलीच्या आईची मानसिक धक्काने प्रकृती खालावल्याने तिला विजयगोपाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून तिला भिडी येथे हलविण्यात आले. सदर युवती भिडी रुग्णालयात असल्याचे तिच्या नातलगांना दिसून आले. तिलाही येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मुलीची प्रकृती खालावत असल्याने देवळी पोलिसांनी रात्री १२ वाजता भिडी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत या प्रकरणात कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हे विशेष. या गुन्ह्याचे घटनास्थळ देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने देवळी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. देवळी पोलिसांनी झिरोचा गुन्हा नोंद करून प्रकरण पुलगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या दोन युवकांना पुलगाव पोलिसांनी संशयित म्हणून घटनेतील दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिपर्यंत त्यांना आरोपी म्हणून अटक केलेली नव्हती. याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस करीत आहे.(वार्ताहर)आरोपीविरूद्ध गुन्हा दाखलया प्रकरणात पुलगाव पोलिसात ३६३, ३६६, ३७६/२, ग, ५०६, १३२/१५, ६९ ग, बाल अत्याचार कायदा २०१२ यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक दाखविण्यात आली नाही. पोलीस पुन्हा कशाची चौकशी करणार आहे, याबाबत समजू शकले नाही.