शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
2
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
7
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
8
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
9
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
11
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
12
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
13
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
14
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
15
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
16
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
17
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
18
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
19
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
20
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही

सामाजिक दायित्वाचा परिचय देणारे असेही ‘एक लग्न’

By admin | Updated: February 21, 2016 01:24 IST

पाच-सहा वर्षांपूर्वी आई-वडिलांचा आणि मोठ्या भावाचाही झालेला मृत्यू येथील एका युवकाला पोरका करून गेला.

नातलग नसलेल्या युवकाचा धडाक्यात विवाह : मदतीसाठी सरसावले गावकरीकिशोर तेलंग तळेगाव (टा.)पाच-सहा वर्षांपूर्वी आई-वडिलांचा आणि मोठ्या भावाचाही झालेला मृत्यू येथील एका युवकाला पोरका करून गेला. बेघर वस्तीत राहून तो कुटुंबांचे स्वप्न रंगवित होता; पण कुणाचीही साथ नसल्याने एकाकी पडला होता. अशातच ग्रामस्थांची भरभक्कम साथ लाभली आणि चमत्कारच झाला. एकटाच जगत असलेल्या त्या युवकाचा विवाह सोहळा धडाक्यात पार पडला. मदतीसाठी गावकऱ्यांचे हात सरसावले आणि हा विवाह सोहळा खऱ्या अर्थाने सामाजिक दायित्वाचा परिचय देणारा ठरला. सतीश श्यामराव झाडे (३०), असे भाग्यशाली युवकाचे नाव आहे.गावातील वॉर्ड क्र. ४ येथील बेघर वस्तीत सतीश श्यामराव झाडे हा माळी समाजाचा मुलगा गत कित्येक वर्षांपासून एकाकी जीवन जगत होता. बहीण नाही, मोठ्या भावाचे निधन झालेले आणि आई-वडिलांचे छत्रही पाच-सहा वर्षांपूर्वीच हरविलेले! यामुळे कुटुंबात तो एकटाच राहिला. वडीलधारी मंडळी व विशेष नातलगही नसल्याने विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होते. शिवाय शेती वा अन्य व्यवसाय नसल्यानेही लग्न जुळेना! ही खंत सतीशच्या मनात सलत होती. समाजातीलच काही होतकरू तरूणांना ही बाब कळली आणि सुरू झाली त्याचे लग्न जुळविण्याची सामाजिक धडपड! ग्रामस्थ व युवकांच्या पुढाकाराने सतीशचे लग्न जुळले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने हारावरच लग्न करावे, असा त्याचा मानस होता; पण पण वधुकडील मंडळीला मुलीचे लग्न करायचे होते. एकट्याने हे जमणार नाही, याची कल्पना आल्याने सतीशने सरपंच अतुल तिमांडे व ग्रा.पं. सदस्य गजानन येवतकार यांना माहिती दिली. त्याच्या आर्थिक स्थितीची सर्वांनाच जाणीव होती. परिणामी, सरपंच तिमांडे व सदस्य येवतकार यांनी ग्रामस्थांच्या पुढाकाराने तुझेही मोठे लग्न करू, असा धीर दिला. हा शब्द पाळण्यासाठी मग, सारे ग्रामस्थच एक झाले व सतीशचे लग्न धडाक्यात झाले. ग्रामस्थांच्या ऐक्याने हा विवाह आदर्श ठरला.वायगावात झाला विवाहतळेगाव (टा.) : बुधवारी (दि.१७) वायगाव (नि.) येथील बालाजी मंदिर येथे विवाह सोहळा आयोजित होता. नवरदेवासाठी एक चार चाकी, दोन-चार आॅटोसोबत बँडपथक होते; पण सतीशच्या सोज्वळ स्वभावामुळे लग्नाचे वऱ्हाडी आपापली सोय करीत वायगाव येथे पोहोचले. सायंकाळी नवरदेव तळेगाव येथे पोहोचताच ढोल-ताशाच्या निनादात वरातही काढली गेली. सतीशचा स्वागत समारंभही तेवढ्याच थाटात गुरूवारी (दि.१८) यशवंत हायस्कूल पार पडला. यात सुमारे ८०० वऱ्हाड्यांची जेवणाची सोय करण्यात आली होती. शिवाय नाचणाऱ्यासाठी ‘डीजे’ ठेवण्यात आला. सोज्वळ, मनमिळावू स्वभावाचा धनी असलेल्या सतीशला आशीर्वाद देण्यासाठी हजारो हात मदतीला सरसावले. गावातील सर्वानीच आपापल्या पद्धतीने मदत केली. सरपंच अतुल तिमांडे, ग्रा.पं. सदस्य गजानन येवतकार व भगतसिंग स्पोर्टींग क्लबने यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सोहळा दोन कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा असल्याचा आणि सामाजिक दायित्वाचा परिचय तळेगावच्या ग्रामस्थांनी करून दिला.हळदीच्या कार्यक्रमातही २०० वऱ्हाड्यांची उठली पंगतसतीश लग्नासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. काहींनी पत्रिका छापल्या, कुणी लग्नाला लागणारे साहित्य घेऊन दिले, मुलाचे कपडे, मनी, डोरले नातलगांनी केले. वॉर्डातील महिलांनी त्याच्या हळद, न्हानोऱ्याची सोय केली. संपूर्ण गाव एकवटल्याने हळदीच्या जेवणाचा कार्यक्रमही मोठाच झाला. या कार्यक्रमात लग्नाच्या पूर्वसंध्येला २०० वऱ्हाड्यांच्या जेवणाचा कार्यक्रम लोकसहभागातून पार पडला. सतीश झाडे या मुलाचे कुटुंब व्यवस्थित चालावे यासाठी मी त्याला व्यवसाय लावून देणार आहे. शिवाय ज्या मुला-मुलींना कुणी नाही, त्यांना सहकार्य करण्यासाठी समाजातील पुढाऱ्यांनी मदत करणे गरज आहे. यापुढेही मी अशा मुला-मुलींच्या लग्नप्रसंगात मदत करीत राहील.- अतुल तिमांडे, सरपंच, ग्रा.पं. तळेगाव (टालाटुले)प्रत्येक गावात अशा मुला-मुलींना आधार मिळावा यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.- गजानन येवतकार, सदस्य, ग्रा.पं. तळेगाव (टा.)