शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

तुळशी विवाहानंतर उडणार विवाहेच्छुकांच्या लग्नाचे बार

By admin | Updated: November 24, 2015 05:13 IST

दिवाळीपासूनच अनेकांच्या घरी लग्नाचे वेध लागतात. हिंदू धर्मियांत तुळशी विवाह आटोपल्यावरच लग्न करण्याची प्रथा असल्याने

पराग मगर ल्ल वर्धादिवाळीपासूनच अनेकांच्या घरी लग्नाचे वेध लागतात. हिंदू धर्मियांत तुळशी विवाह आटोपल्यावरच लग्न करण्याची प्रथा असल्याने सर्वांनाच तुळशी विवाहाची वाट असते. त्यामुळे विवाहयोग्य मुले, मुली तसेच त्यांच्या घरची मंडळी व आप्तेष्ट आदींची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी तुळशीविवाहाला सुरुवात झाल्याने लवकरच लग्नाचे बार उडणार आहे. मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुुरुवात होते. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पार पडतात. त्यानंतर विवाहेच्छुकांच्या लग्नाचे बेत आखले जातात. अनेकांचा साखरपुडा तुळशीविवाहापूर्वीच आटोपला आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त पाहून कार्यालयाची बुकिंग आणि लग्नाच्या खरेदीची लगबग लवकारच सुरू झाली आहे. सोबतच लग्नपत्रिका, वधुवरांचे कपडे आदींची खरेदीही सुरू झाली आहे. या सर्वात महत्त्वाची असते ती लग्नाची तारीख म्हणजे मुहूर्त. आपल्या सुविधेप्रमाणे लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी ब्राह्मणांकडे जाण्याची नागरिकांची रिघ लागली आहे. कारण लग्नाची तारीख ठरविल्याशिवाय लग्न कार्यालय आणि पर्यायाने इतर गोष्टी ठरविता येत नसल्याने आधी मुहूर्त पाहिले जातात. त्यामुळे तुळशी विवाहाचे वेध लागल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे. यंदाही व्हॅलेंटाईनला लग्नाचा बेत आखणाऱ्यांचा हिरमोड४अनेक जण फेब्रुवारी महिन्यात १४ तारखेला असलेला व्हॅलेंटाईन डे पाहून लग्नाचा बेत आखतात. परंतु गातवर्षीप्रमाणेच यंदाही पंचांगानुसार या दिवशी मुहूर्तच नसल्याचे दिसते. तरीही याच दिवशी लग्न करण्याचे अनेक जणांनी ठरवल्याने व्हॅलेंटाईन डे ला शहरातील बहुतेक कार्यालये अल्पावधीतच आरक्षित केले जातात. चार ते पाच महिन्यांपासून मंगल कार्यालये आरक्षित ४बरेचदा लग्नाची तारीख निघाल्यावर त्या तारखांमध्ये आवडीचे कार्यालयच मिळत नसल्याची शक्यता असते. त्यामुळे आधी तारखांचा अंदाज घेऊन कार्यालये आरक्षित केली जातात. शहरात चार ते पाच महिन्यापासून कार्यालयाचे आरक्षित केले जात असल्याचे मंगल कार्यालयाचे मालक सांगतात. यंदा गुढीपाडव्यापर्यंत विवाहाचे ५४ मुहूर्त४मराठी पंचांगानुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यामुळे विवाहमुहूर्ताचे दोन भाग पाडले जातात. त्यानुसार गुढी पालटण्यापूर्वी कार्तिक महिन्यापासून यंदा लग्नाचे ५४ मुहूर्त सांगण्यात आले आहेत. इंग्रजी महिन्यांचे चलन जास्त असल्याने अनेकांना मराठी महिन्याचे मुहूर्त कळत नाही. त्यामुळे सरळ सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नोव्हेंबर महिन्यातील २४ तारखेपासून लग्नाचा बार उडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्नाचे २४,२६, २७ असे मुहूर्त आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात ४, ६, ७, ८, ९, १०, १५, १६, २०, २१, २४, २५, २९, ३० जानेवारी महिन्यात १, २, ३, ४, १७, २०, २१, २६, २८, २९, ३०, ३१ फेब्रुवारी महिन्यात १, २, ५, १३, १६, १७, २५, २७, २८, मार्च महिन्यात १, ३, ५, ६, ११, १४, १५, २१, २५, २८, ३१, आणि एप्रिल महिन्यात १, २ आणि ४ असे मुहूर्त आहे.