शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘पवित्र रमजान’ला प्रारंभ होताच बाजारपेठही सज्ज

By admin | Updated: June 20, 2015 02:29 IST

मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली.

वर्धा : मानवी जीवनातील धार्मिक श्रद्धा व परंपरांना विवेकी विचारांची जोड देऊनच पूर्वजांनी अनेक पूजा विधींची निर्मिती केली. यातील अनेक परंपरा आजही मानवाच्या प्रगतीला पोषकच ठरल्याचे दिसून येतात. सर्वधर्मसमभावाची कास धरणाऱ्या या देशात इस्लाम धर्मीयांनी देखील हीच विवेकाची परंपरा सुरू ठेवली. शुक्रवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते. रोजा म्हणजे मराठी भाषेत उपवास होय. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाढून मेद धातूचे पचन होते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होऊन शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनइंद्रिये शुद्ध होऊन पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होऊन जीवन यशस्वी होते. म्हणूनच इस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खान-पान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लीमबांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील चोवीस तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणच असल्याचे मानले जाते. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नमाजही पठण करतात. सात वर्षापासून तर वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. रोजा सोडणाऱ्याकरिता मस्जिद परिसरात विविध समित्यांकडून सोईसुविधा उपलब्ध करून दिले जाते. घरोघरी कुराणाचे पठणही होते. त्यामुळे शुक्रवारपासून शहरासह जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते.(शहर प्रतिनिधी)सेवई व खजूरसह अन्य पदार्थांची रेलचेलरमजानचा उत्सव साजरा करण्याकरिता मुस्लिम बांधवांनी जय्यत तयारी केली. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. रमजाननिमित्त कुटुंबातील सगेसोयरे आपल्या मूळ घरी उत्सहाने उपस्थित होतात. कुराणचे पठण करण्यासाठी धार्मिक कार्यक्रमामध्ये श्रद्धेने सहभागी होतात. मस्जिद परिसरात विविध प्रकारचे खजूर आणि खीरखुरमा साठी वेगवेगळ्या प्रकारच्या शेवता विक्रीस पहावयास मिळतात. खास अफगाण देशातून हे खजूर मागविले जातात. आबालवृद्धांसोबत मुस्लीम युवक युवतीच नव्हे लहान मुलेही रोजा ठेवत असतात.