शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मार्चमध्येच जिल्ह्याला ‘मे हिट’चा तडाखा

By admin | Updated: March 30, 2017 00:29 IST

उन्हाळ्यामध्ये साधारणपणे मे महिन्यात सर्वाधिक उष्णतामान असते; पण यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच पारा ४३.८ अंशांवर

पारा @ ४३.८ : ४५ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज वर्धा : उन्हाळ्यामध्ये साधारणपणे मे महिन्यात सर्वाधिक उष्णतामान असते; पण यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच पारा ४३.८ अंशांवर पोहोचल्याने जिल्ह्याला मार्च महिन्यातच मे हिटचा तडाखा सोसावा लागतोय. हा पारा ४५ अंशांपर्यंत वाढेल, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला. मध्यप्रदेशातील ‘वॉर्म स्पेल’चा हा प्रभाव असल्याचेही सांगण्यात आले आहे. विदर्भातील उष्णतामानात किमान २ एप्रिलपर्यंत सातत्याने वाढ होणार आहे. यात पारा ४४ ते ४५ अंशांपर्यंत वाढेल, असे संकेत आहेत. मध्यप्रदेश येथे सध्या ‘वॉर्म स्पेल’ सुरू आहे. परिणामी, उष्णतामानात वाढ होत आहे. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने तापमान वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. शिवाय मध्यप्रदेशातून वाहणारे उष्ण वारे विदर्भावर परिणाम करीत आहेत. यामुळे येथील तापमानात वाढ झाली आहे. वॉर्म स्पेलमुळे कमाल आणि किमान तापमानातही सतत वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील वॉर्म स्पेल विदर्भातील तापमान वाढवित असल्याने जिल्ह्यात उन्हाळा जड जाणार असल्याचेच दिसते.(कार्यालय प्रतिनिधी) एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणाची शक्यता कर्नाटक प्रदेशात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे; पण त्यामुळे पावसाच्या सरी होण्याची शक्यता नसून केवळ ढगाळ वातावरण राहील. यामुळेही उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. यंदा अवकाळी पाऊस न झाल्याने विदर्भ प्रदेश कोरडा झाला असून अधिक उष्णतामान जाणवत आहे. वॉर्म नाईटचाही प्रभाव सतत वाढणाऱ्या उष्णतामानाला वॉर्म नाईटही कारणीभूत आहे. वॉर्म नाईटच्या स्थितीत किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशाने वाढत असते. ही स्थिती सध्या विदर्भातील बुलडाणा व अकोला जिल्ह्यात आहे. हा घटकही उष्णतावाढीस कारणीभूत आहे. सध्या विदर्भात तापमान वाढीस पोषक वातावरण आहे. यामुळे प्रत्येक दिवशी ०.४ ते ०.५ अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती २ एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही सर्वसाधारण भौगोलिक घटना असून याला अन्य कुठलेही घटक कारणीभूत नाहीत. - अविनाश ताठे, संचालक, वेधशाळा, नागपूर.