शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांचे देव पाण्यात

By admin | Updated: July 14, 2014 02:23 IST

नगराध्यक्षाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या

भास्कर कलोडे हिंगणघाटनगराध्यक्षाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपणच नगराध्यक्ष व्हावे असे वाटू लागले आहे. या स्वप्नपपूर्तीकरिता साऱ्यांनीच देव पाण्यात सोडले आहे; मात्र जिल्ह्यात खासदाराच्या निवडणुकीतील सत्ता बदल व माजी खासदार दत्ता मेघे यांचा भाजप प्रवेश यामुळे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३३ नगरसेवकांच्या या नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून त्यांचे सहा नगरसेवक आहेत. काँग्रेस पाच, भाजपा तीन व मनसेचा एक नगरसेवक आहे. अपक्षाची संख्या आता पुन्हा सहा वर पोहचली आहे. गत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत समीर कुणावार आघाडी म्हणून नोंद केलेले अपक्ष नगरसेवक पंढरीनाथ कापसे, विठ्ठल गुळघाने व जितेंद्र कुकसे या तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत त्यांना अपक्ष समजण्याची मागणी केली. ३३ नगरसेवकांच्या या पालिकेत बहुमतासाठी १७ चा जादूई आकडा जुळवण्याची क्षमता असणाऱ्याची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याने घोडा बाजाराला तेजी यावी म्हूणन अनेक नगरसेवक पाण्यात देव ठेवून बसले आहेत. राकाँचे प्रमुख उमेदवार अ‍ॅड.सुधीर कोठारी यांनी मात्र पक्षाने जर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तर ती स्विकारण्याचा पवित्रा घेतला आहे. सद्या स्थितीत सर्वाधिक १२ सदस्यांच्या राकाँमध्ये इच्छूकाच्या गर्दीत विद्यमान नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, माजी नगराध्यक्ष हरिदास काटकर, प्रलय तेलंग, शुभांगी डोंगरे, निता धोबे यांनी फिल्डींग लावली आहे. नगराध्यक्ष पदाच्या गत निवडणुकीत काँगे्रस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होवून राकाँचे सुरेश मुंजेवार यांनी १८ मते घेवून काँग्रेसच्या पुष्पा कटारे यांचा १४ मतांनी पराभव केला होता. कटारे यांना पाच मते मिळाली होती. त्यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांनी एकला चलोरेची भुमिका घेतली होती.आता माजी खासदार दत्ता मेघे भाजपवासी झाले आहेत. यात मतदार क्षेत्राचे आमदार सेनेचे व त्याच्या सोबतीला दत्ता मेघे असल्याने येथे भाजपची सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात अपक्षाच्या रांगेत लागलेल्या पंढरीनाथ कपासे भाजपाचे उमेदवार ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे येथील नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.