शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

सफाई कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित

By admin | Updated: January 17, 2015 02:21 IST

सफाई कामगारांच्या न्यायशीर मागण्याची पूर्तता करण्याकडे वर्धा नगर परिषदचे उच्चाधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने सफाई कामगारांवर अन्याय होत आहे.

वर्धा : सफाई कामगारांच्या न्यायशीर मागण्याची पूर्तता करण्याकडे वर्धा नगर परिषदचे उच्चाधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने सफाई कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी होत आहे. शासकीय आदेशाप्रमाणे सफाई कामगारांचे मासिक वेतन प्रत्येक महिण्याच्या ७ तारखेस करण्याबाबत, नगर परिषदेची सर्व साधारण सभा २७ नोव्हेंबर २००९ विषय क्र. ७ अनुसार सर्वानुमते पारित झाली. यातील ठरावानुसार सहाव्या वेतनाची १ जानेवारी २००६ ते २००९ पर्यंतची थकबाकी ही राज्य शासनाच्या धोरणानुसार भविष्य निधीच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्याबाबत, उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्याकडे दाखल झालेल्या रिट याचिका क्र. २२२२/२००९, ३५४५/२०००, व ३०२१/१९९९ मध्ये याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने २ जुलै २००३ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले होते. आयुक्त व संचालक नगर पालिका प्रशासन महाराष्ट्र शासन राज्य मुंबईची अमलबजावणी करण्याबाबत, सफाई कामगारांना शासकीय सुट्या लागू करण्याबाबत संचालनालय यांनी प्ररीत केलेल्या परिपत्रक क्र. एम.सी.ए १०९६/प्र.क्र. १७३/५ १४ डिसेंबर १९९६ ची अंमलबजावणी करून शासकीय सुट्टी लागू करण्याबाबत, सफाई कामगारांना घरे बांधुन देण्याबाबत, शासन नगर विकास विभाग निर्णय क्र. साकिनि- २०१२, प्र. क्र. १६६/२०१२/ नवि. ६ दि. २८ मार्च २०१३ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे. सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये मागील ५-६ वर्षापासून साडेआठ टक्के लावण्यात न आलेले व्याज त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावे, सफाई कामगारांची सकाळी नगरसेवकाजवळ लावण्यात येणारी बेकायदेशीर हजेरी तसेच ड्युटी करूनही नगर सेवकाद्वारे लावण्यात येणारी गैर हजेरी या प्रकाराला बंदी लावण्याचे आदेश देण्यात यावे आदी मागण्यासांठी सफाई कामगार संघटनेच्या वर्तीने नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर करून सदर मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)