शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प किमतीमुळे अनेकांचा कापूूस घरीच

By admin | Updated: December 27, 2014 02:17 IST

नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली.

रोहणा : नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली. त्यामुळे दृष्टचक्रात सापडलेले रोहणापरिसरातील शेतकरी कृषी मूल्य आयोग कापसाचा हमीभाव केव्हा वाढविणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहे. अनेकांनी अद्यापही कापूस विकला नसून शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे. कापूस बियाणे सातशे रूपये प्रति बॅग वरून रू़ ९५०, बैल जोडीद्वारा पेरणी भाडे रू़५०० वरून १२००, डी़ए़पी़ रासायनिक खत ६०० वरून ११८४, फवारणीच्या कीटकनाशकांच्या किंमतीत सुमारे २५ टक्के झालेली वाढ, महिलांची मजुरी १०० वरून १५० तर पुरूषांची मजुरी १५० वरून २५० रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे उत्पादन खर्च भरमसाठ वाढला. प्रथम पावसाची दडी, नंतर अतीपाऊस, त्यानंतर वादळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे प्रचंड नापिकी व अत्यल्प उत्पादन या पार्श्वभूमीवर कापसाचे हमीभाव मागील तीन वर्षात ५० च्या फरकाने वाढवून ४ हजार ५० केले. मागील वर्षी कापूस उत्पादकांना खाजगी व्यापाऱ्यांनी रू़ ५ हजार ५०० पर्यंत भाव दिले़ जागतिक मंदीचे कारण पुढे करत खाजगी व्यापारी कापूस घेण्यास उत्सुक नाही़ शासनाने का कू करत काही मोजक्याच केंद्रांवर ४ हजार ५० रुपये हमीभाव देत कापूस खरेदी सुरू केली़ हा भाव कापूस उत्पादकांना अजिबात परवडणारा नाही़ त्यामुळे अनेकांनी आपला कापूस अद्याप विकायला न काढता घरीच ठेवला आहे. पण नाईलाज म्हणून काहींना तो मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.(वार्ताहर)