शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मंगेशची आत्महत्या नसून हत्याच; ग्रामस्थांचा आरोप

By admin | Updated: June 25, 2014 23:55 IST

वर्धपूर-वडाळा येथील मंगेश डाखोरे या २५ वर्र्षीय युवकाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत आढळला़ या प्रकरणात मंगेशच्या हत्येला जबाबदार व दोषी असलेल्या आरोपींना गुन्हा

आष्टी (श़) : वर्धपूर-वडाळा येथील मंगेश डाखोरे या २५ वर्र्षीय युवकाचा मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत आढळला़ या प्रकरणात मंगेशच्या हत्येला जबाबदार व दोषी असलेल्या आरोपींना गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा, अशी मागणी ग्रामस्थांनी ठाणेदारांना केली़ यासाठी सुमारे १०० ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली़बुधवारी वर्धपूर-वडाळा येथील नागरिक मोठ्या संख्येने आष्टी पोलीस ठाण्यात दाखल झाले. ग्रामस्थांनी मंगेशची आत्महत्या नसून हत्याच झाल्याची माहिती ठाणेदार रमाकांत दुर्गे यांना दिली. लगेच पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे, शिपाई मंगेश राऊत गावात पोहोचले़ मंगेशचा मृतदेह ज्या विहिरीत आढळला, त्या ठिकाणापासून ४०० मीटर अंतरावर त्याचे शेत आहे. मारहाण झाली, त्या ठिकाणी पोलिसांना रक्ताचे डाग व चप्पल मिळाली़ शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नाही़ यामुळे नेमका मृत्यू कशाने झाला, हे अहवाल आल्यानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार मंगेश वडाळा गावातून वर्धपूरकडे जात असताना त्याचे सत्तरपूर फाट्याजवळ शेत आहे. मंगेश सायकलवर प्रवास करीत होता. त्याला काठीने मारून जखमी करण्यात आले. यानंतर शेतात नेऊन शस्त्रांनी जबर मारहाण करण्यात आली़ यात त्याचा मृत्यू झाला़ मृतदेहाची माहिती कुणालाही मिळू नये म्हणून धरणाच्या बुडित क्षेत्रातील विहिरीत टाकला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंगेशच्या मित्रांनी व घरातील एका व्यक्तीने हत्येचा बेत आखल्याची चर्चा आहे. मंगेशच्या डोक्याला खोलवर जखमा आहे. मारहाण झाल्याने रक्त सांडले, हे आता स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी प्रकरण रेटून धरल्याने सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी वर्र्धपूरच्या नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून मंगेशच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)