शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बँक आॅफ इंडिया बनावट सोने प्रकरणातील ठगसेन मंगेश साठे याला जालना येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 17:38 IST

बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला १ कोटी ४१ लाखांनी गंडा घालणारा मुख्य आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा अखेर खरांगणा पोलिसांच्या हाती लागला.

ठळक मुद्देतब्बल चार महिन्याने गवसला आरोपीसहभागी लोकांची नावे पुढे येणार

अरविंद काकडे।आॅनलाईन लोकमतवर्धा : बँक आॅफ इंडियाच्या मोरांगणा शाखेत बनावट सोने तारण ठेवून बँकेला १ कोटी ४१ लाखांनी गंडा घालणारा मुख्य आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा अखेर खरांगणा पोलिसांच्या हाती लागला. ठाणेदार निशीकांत रामटेके, शिपाई मनीष श्रीवास, सचिन पवार, राजेश शेंडे व सहकाऱ्यांनी त्याला जालना येथून ताब्यात घेतले.ठगसेन साठे याने १६ लोकांच्या नावावर बनावट सोन्याचे मनगटी कडे व बांगड्या तारण ठेवून त्यावर कर्जाची उचल केली होती. २४ डिसेंबर २०१२ ते २१ डिसेंबर २०१३ या कालावधीत लोकांना जर्सी गाई मंजूर झाल्या, असे सांगून बँकेत नेत सोने तारणच्या कागदपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या. परस्पर बँकेतून रकमेची उचल केली होती. मुदत संपूनही सोने सोडविले नाही म्हणून बँकेने ३० जुलैला सोन्याचा लिलाव ठेवला होता. यावेळी तपासणीत सोने बनावट असल्याचे उघड झाले व बँकींग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ‘लोकमत’ने सदर प्रकरण रेटून धरल्यानंतर शाखा प्रबंधक गणेश बाजीराव नईकर यांनी सोनारासह १७ लोकांच्या नावाची पोलिसात तक्रार दाखल केली होती.तक्रारीवरून १७ लोकांविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ४०८, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस मुख्य आरोपी मंगेश साठे याचा शोध घेत होते. या कालावधीत पोलिसांनी विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेशात त्याचा शोध घेतला; पण तो हुलकावणी देत होता. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी ‘काहीही करा; पण आरोपीला शोधा’, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यामुळे ठाणेदार रामटेके यांनी अत्यंत गुप्त पाळत शोध सुरू केला होता. तो जालन्यात दडून बसल्याची गुप्त माहिती रामटेके यांना मिळाली. यावरून रात्रीतूनच जालना गाठत त्याला अटक करण्यात आली.यामुळे बनावट सोने तारण प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळणार आहे. बँकेच्या ज्या-ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य आरोपीला मदत केली, त्या सर्वांची चौकशीची शक्यता आहे.

आजपर्यंत केलेली कारवाईया प्र्रकरणात आतापर्यंत १८ लोकांवर गुन्हे दाखल झालेत. यात ठगसेन मंगेश रामकृष्ण साठे हा मुख्य आरोपी आहे. सोनार रामदास गोविंद खरवडे या आरोपीने नागपूर उच्च न्यायालयातून जामीन मिळविला. साठेला मदत केल्याप्रकरणी राजेश लक्ष्मण कालोकर यालाही अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन दिला.

कोणत्या बाबी होणार स्पष्टठगसेन साठेला बोलते केल्यास यात सहभागी कर्मचाऱ्यांची नावे पूढे येऊ शकतात. अन्य कुठे असे सोने तारण ठेवले काय, ही बाब स्पष्ट होईल. ५ किलो ८९३ ग्रॅम वजनाचे मनगटी कडे व बांगड्या कोणत्या सोनाराने बनविल्या, त्यावर मुलामा कुणी दिला, या बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे. दारिद्र रेषेखाली जीवन जगणाºया कवडू अवचित खोब्रागडेच्या नावावर ८ लाख ५० हजारांचे कर्ज उचलणारा आरोपी प्रशांत यादवराव नाईक याची भूमिका तपासणे गरजेचे आहे. नाईक दाम्पत्याच्या नावेही १७ लाख ८० हजारांचे बनावट सोने तारण आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा