शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या वेशातील पुरुषाने दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:02 IST

ऑनलाईन लोकमत आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आले. या चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच एकच खळबळ ...

ठळक मुद्देशेतात कापूस वेचत होती महिला

ऑनलाईन लोकमत आकोली : चोर चोरी करण्यासाठी नानाविध क्लुप्त्या वापरत असतात. असाच काहीसा प्रकार खरांगणा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येत असलेल्या कामठी शिवारात घडला. शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेला एका पुरूषाने महिलेच्या वेशात येत गंडा घातल्याचे समोर आले. या चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.उषा नरेंद्र कोसुळकार (३१) रा. कामठी ही महिला दुपारच्या सुमारास कामठी शिवारातील स्वत:च्या शेतात कापूस वेचत होती. ती आपल्या कामात गुंग असताना तिच्यासमोर अचानक साडी घातलेला, डोक्यावर पदर व तोंडाला स्कार्फ बांधलेला पुरुष पाठीमागून आला व चुपचाप तुझ्याजवळ जे असेल ते दे. आरडा-ओरड करू नको, अशी दमदाटी केली. यामुळे महिलेने गळ्यातील दीड ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, एक ग्रॅम सोन्याचे मनी व साडेतीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप, असा एकूण ३ हजार ५०० रुपयाचा ऐवज काढून दिला. हा ऐवज घेवून स्त्री वेशातील चोरटा पसार झाला. घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात जमादार ओमप्रकाश इंगोले, जमादार दिनेश गायकवाड या संशयीत चोरट्याचा शोध घेत आहेत. सदर घटनेने कापूस वेचणाऱ्या महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गत वर्षी याच हंगामात महिला कामाला गेल्या असताना घरातून ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा चोरट्यांनी नवी पद्धत अंमलात आणल्याने शेतमजूर महिला दहशतीत आल्याचे दिसत असून पोलिसांनी चोरटे पकडणे गरजेचे झाले आहे.महिलांमध्ये भीतीचे वातावरणसध्या कापूस वेचनीचा हंगाम सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील महिला त्यांच्या शेतात तर काही महिला दुसºया शेतकऱ्यांच्या शेतात कामाकरिता जात आहेत. शेतात कापूस वेचताना महिलांची संख्या कमी असल्याने त्या दूर-दूर असतात. यात चोरीचा हा प्रकार घडल्याने महिलांत भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी या चोरट्याला पकडून महिलांच्या मनात असलेली भीती कमी करावी, अशी मागणी होत आहे.