शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

स्वत: सोबत दुसऱ्याचाही मानसमित्र बना

By admin | Updated: November 13, 2016 00:47 IST

माणसाचा मेंदू जेव्हा हॅग होतो तेव्हा अनेक विध्वंसक प्रकार घडतात. नैराश्याचा आजार हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे.

हमीद दाभोळकर : मानसिक आरोग्य, समाज अंधश्रद्धेवर व्याख्यानवर्धा : माणसाचा मेंदू जेव्हा हॅग होतो तेव्हा अनेक विध्वंसक प्रकार घडतात. नैराश्याचा आजार हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे. तो आजार घालविण्यासाठी प्रत्येक माणसाने सकारात्मक विचार करून स्वत: सोबतच दुसऱ्यांचा मानसमित्र बनून त्याला आधार द्यावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुरूवार १० नोव्हेंबर रोजी अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे आयोजित मानसिक आरोग्य, समाज अंधश्रद्धा या विषयावरील व्याख्यानात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास जाजू तर प्रमुख अतिथी म्हणून अनेकान्त स्वाध्याय मंदिरचे सचिव अरूण चवडे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार याची उपस्थिती होती. डॉ. दाभोळकर पुढे म्हणाले, माणसाचे मन हे मेंदूत असत. जेव्हा मनावर मर्यादेपेक्षा जास्त ताण येतो, तेव्हा नैराश्य येते आणि याचा परिणाम त्याच्या दैनंदिन जीवनावर होतो. यातूनच दरवर्षी भारतात एक लाख मनु्ष्य आपले आयुष्य स्वत:च संपवितात. हे थांबविण्यासाठी बुवा बाबांच्या मागे न लागता तज्ज्ञ मनोविकारांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संजय भगत, अजय मोहोड, भिमसेन गोटे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. संचालन प्रा. अजय सावरकर यांनी केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी तर आभार सुनील ढाले यांनी मानले. यशस्वीतेकरिता भरत कोकावार, सारीका डेहनकर, हेमंत धोनारकर, अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, मयूर डफळे, आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)