शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी शिष्यवृत्तीसाठी मर्यादा सहा लाख करा

By admin | Updated: May 8, 2016 02:41 IST

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे.

महात्मा फुले समता परिषदेचे पालकमंत्र्यांना साकडेवर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्व पक्षीय आमदारांनी ११ डिसेंबर २०१३ ला नागपूर अधिवेशनात लक्षवेधी लावत शासन निर्णय मंजूर करवून घेतला; पण तो आदेश निघाला नाही. आता भाजपचे सरकार असल्याने ३१ मे पर्यंत शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली. याबाबत शुक्रवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.विधानसभेची पाच अधिवेशने झाली. प्रत्येक अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री सहा लाखाचा शासन निर्णय काढणार, अशी ग्वाही देतात. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेच सांगत आहे; पण सहा लाखाचा शासन निर्णय अद्याप निघाला नाही. आता तर शाळा, महाविद्यालयाचे नवीन सत्रातील प्रवेश सुरू होत आहे. अशावेळी हा शासन निर्णय निघाला नाही तर पुन्हा ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. शासनाची ओबीसींप्रती नियत चांगली असेल तर ३१ मे २०१६ पर्यंत शासनाने सहा लाखाचा शासन निर्णय काढावा. अन्यथा या घोषणा ओबीसीची फसवणूक करणाऱ्या आहेत, असे समजून १ जूनपासून महात्मा फुले समता परीषद, ओबीसी संघटना व ओबीसींची शिष्यवृत्ती आंदोलन सुरू करेल. त्याचा पहिला बँडबाजा चंद्रपूर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर पुन्हा दुसऱ्यांदा वाजविला जाईल, असा इशाराही निवेदनातून महात्मा फुले समता परिषदेने दिला. ओबीसी विद्यार्थ्यांच्या १०० टक्के शिष्यवृत्तीसाठीसुद्धा असेच संभ्रमित व बेकायदेशीर परिपत्रके, शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाद्वारे काढण्यात आले. वास्तविक, केंद्र शासन शिष्यवृत्तीबाबत विविध प्रवर्गात भेदभाव करीत नाही, असे असताना ओबीसींना एससी, एस.टी. प्रमाणे मिळणारी १०० टक्के शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती कोणतेही कारण न देता ५० टक्के करीत ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला. यासाठी मुख्यमंत्री, कृषीमंत्री व अर्थमंत्री यांनी विरोधात असताना २० डिसेंबर २०१३ रोजी ओबीसी विद्यार्थ्यांनाही एस.सी., एस.टी. प्रमाणेच १०० शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती मिळावी म्हणून नागपूर अधिवेशनात लक्षवेधी लावली होती. त्यावेळी ती फेटाळली होती; पण ओबीसींना शिष्यवृत्तीसाठी आश्वासने देऊन सत्तेत आलेली ही मंडळीदेखील टाळाटाळ करीत आहे. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. ओबीसी शिष्यवृत्तीबाबत अन्याय करणारे निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारचे पातक असल्याचे मत भाजपची मंडळी व आजचे मुख्यमंत्री व्यक्त करीत होते. आता सहा लाखाच्या शासन निर्णयाचे व ओबीसी विद्यार्थ्यांच्या १०० टक्के शिष्यवृत्तीचे पापही फडणवीस सरकारने धुवून काढावे, अशी मागणीही महात्मा फुले समता परिषदेने केली. अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, केशव तितरे, भरत चौधरी, वासुदेव ढुमणे, अभय पुसदकर, सुरेश सातोकर, संजय म्हसके, संजय भगत व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)