शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

बहुमत भाजपला, पण सरपंच राष्ट्रवादीचा वेळ गेल्यानंतर परिवर्तन आघाडी अवतरली

By admin | Updated: December 11, 2015 02:34 IST

लगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यात भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे दहा सदस्य संख्या ....

बहुमत भाजपला, पण सरपंच राष्ट्रवादीचावेळ गेल्यानंतर परिवर्तन आघाडी अवतरलीवर्धा : लगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यात भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे दहा सदस्य संख्या असताना सरपंच पद मात्र राष्ट्रीवादी काँगे्रसने बळकाविल्याने संदीप पाटील सरपंचपदी विराजमान झाले. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ असताना भाजपकडून एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. सरपंचपदाकरिता एकच अर्ज आला असल्याने ही निवडणूक अविरोधच पार पडली. १७ सदस्य संख्या असलेल्या म्हसाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात राष्ट्रवादी काँगे्रसला ६, अपक्ष १, मनसेला ३, कॉँग्रेसला ३ तर भाजपला चार जागेवर यश मिळविता आले. यात भाजप, काँगेस आणि मनसे असे परिवर्तन पॅनल होते. या पॅनलचे एकूण दहा सदस्य निवडून आल्याने सरपंच भाजपाच होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात होती. तहसीलदार राहुल सारंग यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.९) सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करावयाचे होते. राष्ट्रवादी काँगे्रसकडून संदीप पाटील यांनी अर्ज सादर केला तर परिवर्तन पॅनल, भाजप वा मनसेकडून एकाही सदस्याचा अर्ज आला नाही. यामुळे सरपंचपदी संदीप पाटील यांची अविरोध निवड झाली. उपसरपंच पदाकरिता अनिल उमाटे व धीरज वर्मा यांनी अर्ज सादर केले. यात वर्मा यांनी अर्ज मागे घेतल्याने उमाटे यांची निवडही बिनविरोध करण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावयाचे होते. छाणणी झाल्यानंतर २ वाजता उमेदवारांची यादी घोषित होणार होता; पण अर्ज न आल्याने निवडणूक अविरोध झाली. यानंतर २.१० वाजता काहींनी अर्ज सादर करण्याचा प्रयत्न केला; पण यावर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदविल्याने अविरोध निवडणूक कायम राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वासुदेव डेहणे, सहायक अधिकारी म्हणून तलाठी एस.सी. मानकर, सचिव एम.सी गोल्हर यांनी काम पाहिले. म्हसाळा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसने आघाडी करीत सरपंच, उपसरपंच पद काबीज केले. भाजपच्या परिवर्तन पॅनलकडे बहुमत असतानाही जाणिवपूर्वक सत्ता प्रस्थापित केली नसल्याची सर्वत्र चर्चा आहे.(कार्यालय प्रतिनिधी)