शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील सरकारी वकील कायम ठेवा

By admin | Updated: June 29, 2016 02:08 IST

शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील....

विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अ‍ॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील म्हणून असलेला कार्यकाळ संपला आहे. सदर प्रकरण निकालावर येईपर्यंत किमान या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे. रूपेश मुळे नरबळी प्रकरण वर्धा शहरच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजले आहे. एका नऊ वर्षीय बालकाच्या शरीराच्या काही अंगाचे तुकडे करून मांत्रिकाने भाजून खाल्ल्याची ही घटना आहे. या प्रकरणी अ‍ॅड. श्याम दुबे यांनी जोरकसपणे बाजू मांडली. त्यामुळे आरोपीस योग्य शिक्षा होईल, असे संकेत असताना त्यातून त्यांना काढून दुसऱ्या वकीलांना बाजू मांडण्यास सांगितल्या गेले. यामुळे या प्रकरणात शंका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी अ‍ॅड. श्याम दुबे यांनाच पुन्हा नियुक्त करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात शारदा झामरे, प्रा. नुतन माळवी, गजेंद्र सुरकार, सुधीर पांगुळ, विल्सन मोखाडे, भीमसेन गोटे आदींसह नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. शहरात सप्टेंबर २०१५ मध्ये आर्वी नाका परिसरातील रूपेश मुळे याचा नरबळी दिल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. सदर प्रकरण सुरू असताना सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. श्याम दुबे यांनी न्यायालयात ते मांडले. येत्या ३० जून रोजी या प्रकरणातील मुख्य साक्षदार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष असताना अ‍ॅड. श्याम दुबे यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांच्या जागी दुसरे सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. मात्र अ‍ॅड. दुबे यांनी प्रकरणाची पुरेपूर माहिती असून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांची नियुक्ती पुन्हा करावी, असे निवेदन सोमवारी सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती निवेदन सादरकर्त्यांनी दिली. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)