शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम झाला ‘हायटेक’

By admin | Updated: December 3, 2015 02:33 IST

आश्रमाचे संकेतस्थळ रूजू : यात्री निवास येथील सभागृहही यात्रेकरूंसाठी खुले

आश्रमाचे संकेतस्थळ रूजू : यात्री निवास येथील सभागृहही यात्रेकरूंसाठी खुलेसेवाग्राम : महात्मा गांधी यांचा येथील आश्रमही आता ‘हायटेक’ झाला आहे. सेवाग्राम प्रतिष्ठाण आश्रम परिसरात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आता सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने संकेतस्थळही विकसित केले आहे. ‘बापू कुटी सेवाग्राम’ हे संकेतस्थळ व यात्री निवासमधील सभागृह जिल्हाधिकारी आशुतोष सलील व शिक्षा मंडळाचे प्रधान संजय भार्गव यांनी मंगळवारी जनतेकरिता रूजू केले.यात्री निवास येथे आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, शिक्षा मंडळाचे प्रधान संजय भार्गव, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, अधीक्षक भावेश चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. याप्रंसगी जिल्हाधिकारी सलील म्हणाले, आश्रमात नवा बदल होताना दिसून येत आहे. सकारात्मक बदल आश्रमााठी फायद्याचा असून बजाज समूहाचे सहकार्य आश्रमला लाभत असल्याने मदत नक्कीच स्वागतार्ह आहे. भार्गव यांनी भविष्यात गांधी विचारांची प्रकर्षाने जगाला गरज पडणार आहे. त्यांच्या विचारांचे कार्य झाले पाहिजे. गांधीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. महोदय यांनी गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमावर चालणाऱ्या अनेक संस्था आहेत; पण यावर चिंतन व आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. मठकर यांनी आश्रमाच्या माध्यमातून गांधी युवक-युवतीपर्यंत पोहोचावा, स्वच्छता, खादी व कृषीकडे युवकांनी वळावे. आश्रमात सूत ते कपडा उत्पादनाचा मानस त्यांनी व्यक्त केला.यावेळी अभय मलिमे व रवींद्र बैस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.डॉ. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला भैय्या मसानकर, अशोक गिरी, हिराभाई, बाबाराव खैरकार, सिद्धेश्वर उंबरकर, बाबुलाल गणविर, नामदेव ढोले, प्रशांत ताकसांडे, डॉ. शिवचरण ठाकूर, जथ्थू चव्हाण, सरपंच रोशना जामलेकर, गीता कुमरे, मंदा कापसे, पंचफुला सहारे, माधुरी भोगे, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल व कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)आश्रमाची माहितीही आता एका ‘क्लिक’वरकाहीच दिवसांपूर्वी सेवाग्राम आश्रम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यानंतर आता सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे संकेतस्थळ विकसित करण्यात आल्याने बापूकुटी हायटेक होत असल्याचेच दिसून येत आहे. या संकेतस्थळामुळे आश्रमाबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय यात्री निवास येथीन अन्य सुविधाही आॅनलाईन होणार असल्याने पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.