शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाच्या जनजागृतीने महात्मा गांधी जयंती सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:18 IST

Mahatma Gandhi Jayanti Week Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोप आज पूर्ण जिल्ह्यात सायकल रॅलीने करण्यात आला.

ठळक मुद्देहात धुवा, मास्क वापरा आणि सुरक्षित अंतर राखण्याचा दिला संदेशमाझे कुटुंब माझी जबाबदारी घडीपत्रिकेचे प्रकाशन व वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क  वर्धा: माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान जितकं यशस्वीपणे राबवू तेवढं आपल्याला कोरोनावर नियंत्रण करणे सोपे जाईल. कोरोनावर लस यायला किती कालावधी लागेल हे अजूनही निश्चित सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घेऊन स्वत:चा बचाव करणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. हात वारंवार स्वच्छ धुणे, बाहेर जाताना कायम मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखून बाजारात, गर्दीच्या ठिकाणी वावरणे हे तीन नियम पाळले तर आपण स्वत:ला आणि कुटुंबाला या विषाणूच्या संसगार्पासून दूर ठेऊ शकतो. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोप आज पूर्ण जिल्ह्यात सायकल रॅलीने करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कोरोना मुक्ती अभियानाची जनजागृती यावेळी करण्यात आली.सेवाग्राम आश्रम, गांधी चौक, बजाज चौक, आणि आर्वी नाका येथून अनुक्रमे सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, आमदार रणजित कांबळे,खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. चार रॅलीतील सायकल स्वारानी संपूर्ण शहर फिरून जनजागृती केली. रॅलीचा समारोप गांधी चौक येथे नगराध्यक्ष अतुल तराळे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून वितरण करण्यात आले. या रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांची जयंती सप्ताहभर नियमांचे पालन करून साजरी केली. या महामारीच्या काळात आपल्या कुटुंबाला या विषाणू पासून दूर ठेवण्यासाठी काळजी घ्यायची आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने स्विकारली तर कोरोनाचा संसर्ग कमी होऊन महाराष्ट्र या संकटातुन लवकरच मुक्त होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.पोलीस अधीक्षकांनी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे या अभिनंदन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वत: सायकल चालवत सहभाग घेतला. तसेच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सचिन पावडे सतीश जगताप अजय वानखेडे, श्याम भेंडे, मंगेश दिवटे, संजय दुरतकर यांनीही सायकल चालवून माझे कुटुंब माझी जबाबदारीचा संदेश दिला.दरम्यान आर्वी येथे आमदार दादाराव केचे यांनी, कारंजा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, देवळी येथे आमदार रणजीत कांबळे, हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावर तसेच पुलगाव, सेलू, सिंदी रेल्वे, समुद्रपूर येथे तेथिल नगराध्यक्ष व तहसिलदार यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली.

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी