शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; आज प्रचारतोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्ध्यात सर्वच पक्षांनी प्रचारांचा धुराळा उडवून दिला आहे. नामांकन दाखल ...

ठळक मुद्देउमेदवारांची प्रचारासाठी धावपळ : प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्ध्यात सर्वच पक्षांनी प्रचारांचा धुराळा उडवून दिला आहे. नामांकन दाखल केल्यानंतर प्रचाराकरिता बारा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. सोमवारी मतदान होणार असल्याने ४८ तास आधी म्हणजेच शनिवारी हा कालावधी संपणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमदेवारांकडून शेवटच्या दिवशीच्या शक्तिपदर्शनासह जाहीर सभेचे नियोजन करण्याची धावपळ चालली आहे.निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी २१ सप्टेंबर रोजी घोषणा झाली. २७ सप्टेंबरपासून अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी दाखल करण्यात प्रारंभ झाला होता. ७ ऑक्टोंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत चालला. यातही काहींनी बंडखोरी करीत पक्षाच्या उमेदवारीची डोकेदुखी वाढविली आहे. जिल्ह्यातील चारही मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये आर्वी व वर्धा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १० तर हिंगणघाटमध्ये १३ आणि सर्वाधिक देवळी मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहे. या उमदेवारांना प्रचारासाठी मिळालेल्या कालावधीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीरसभा, सोशल मिडीया, प्रचार रॅली, मोटर सायकल रॅली आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. शहरातसह गावातही राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे.आता मतदानाची तारीख तीन दिवसावर आल्याने मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे शनिवार १९ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.चारही मतदारसंघात १ हजार ३१६ मतदान केंद्रप्रशासकीय पातळीवरही धावपळ सुरू असून मतदानासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानयंत्रांची चाचणी घेऊन ते सील करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील चारही मतदार सघांत १ हजार ३१६ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी ५ हजारावर अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहे. मतदानाकरिता कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅटही सज्ज आहे. २० रोजी मतदान कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा