लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीच्या निकषानुसार रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपले शपथपत्र सादर करून त्यामध्ये जंगम व स्थावर मालमत्तेची नोंद केली आहे. त्यावरून जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी नामांकन अर्ज दाखल केलेल्या प्रमुख पक्षांसह दिग्गज उमेदवारांमध्ये तब्बल दहा उमेदवारांची संपत्ती कोटीच्या पार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक संपत्ती हिंगणघाट, देवळी व वर्धा या तिन्ही मतदार संघातील विद्यमान आमदारांकडे असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी मतदारसंघातून आजी-माजी आमदारांसह पक्षातील दिग्गज नेत्यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. निवडणुकीच्या कालावधीत उमेदवारांच्या संपत्तीकडे नेहमीच मतदारांचेही लक्ष लागलेले असते. त्यामुळे उमदेवारांनी आपल्या शपथपत्रावर नमूद केलेली संपत्ती, कर्ज व दागदागिने व वाहनांसह गुन्ह्यांची तपशिलवार माहिती घेण्यात आली.त्यामध्ये हिंगणघाट मतदार संघाचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्याकडे जंगम व स्थावर अशी ९ कोटी ४८ लाखांची संपत्ती आहे. त्यांच्या पाठोपाठ रणजित कांबळे यांच्याकडे ६ कोटी ७३ लाख, डॉ. पंकज भोयर यांच्याकडे ५ कोटी २९ लाख, शेखर शेेंडे २ कोटी ६२ लाख, अशोक शिंदे २ कोटी २५ लाख, राजेश बकाने १ कोटी ९७ लाख, अॅड. सुधीर कोठारी १ कोटी ७८ लाख, अमर काळे १ कोटी ६७ लाख, समीर देशमुख १ कोटी १५ लाख, दादाराव केचे १ कोटी १२ लाख तर राजू तिमांडे यांच्याकडे ३८ लाखांची संपत्ती आहे.यासोबत या उमेदवारांच्या तिजोरीत सोन्या-चांदीचाही ठेवा आहे. यामध्ये डॉ.पंकज भोयर यांचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांच्याकडे १५ लाख ४१ हजार रुपयांचे सोने-चांदी आहे. यासह अॅड. सुधीर कोठारी यांच्याकडे १३ लाख ३० हजार, समीर कुणावार ११ लाख ४० हजार, राजेश बकाने ६ लाख ३० हजार, दादाराव केचे ४ लाख ७० हजार, समीर देशमुख ३ लाख ३९ हजार, रणजित कांबळे ३ लाख, शेखर शेंडे २ लाख ७० हजार, अशोक शिंदे २ लाख ५५ हजार, अमर काळे २ लाख तर राजू तिमांडे यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपयाची सोने-चांदी असल्याची शपथपत्रात नोंद आहे. मागील निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथपत्रातील सपत्तीमध्ये व यावर्षी दिलेल्या शपथपत्रातील संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तसेच शपथपत्रावरुनच या उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती घेतली असता माजी आमदार राजू तिमांडे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, अॅड. सुधीर कोठारी व राजेश बकाने यांच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याचे नमुद आहेत.पाच उच्चशिक्षित, तर चार बारावी उत्तीर्णप्रमुख पक्षांसह दिंग्गज अकरा उमेदवारांपैकी पाच उच्चशिक्षित तर चार उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. यामध्ये डॉ. पंकज भोयर यांनी आचार्य पदवी मिळविलेली आहेत. तसेच रणजित कांबळे एमबीए, समीर देशमुख बीई, राजू तिमांडे बीपीएड, अॅड. सुधीर कोठारी एलएलबी झालेले आहेत. याशिवाय अमर काळे व दादाराव केचे हे पदवीधर असून अशोक शिंदे, राजेश बकाने, शेखर शेेंडे व समीर कुणावार हे चार उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत.
Maharashtra Election 2019 ; दहा कोट्यधीश उमेदवार विधानसभेच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST
प्रमुख पक्षांसह दिंग्गज अकरा उमेदवारांपैकी पाच उच्चशिक्षित तर चार उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत. यामध्ये डॉ. पंकज भोयर यांनी आचार्य पदवी मिळविलेली आहेत. तसेच रणजित कांबळे एमबीए, समीर देशमुख बीई, राजू तिमांडे बीपीएड, अॅड. सुधीर कोठारी एलएलबी झालेले आहेत. याशिवाय अमर काळे व दादाराव केचे हे पदवीधर असून अशोक शिंदे, राजेश बकाने, शेखर शेेंडे व समीर कुणावार हे चार उमेदवार बारावी उत्तीर्ण आहेत.
Maharashtra Election 2019 ; दहा कोट्यधीश उमेदवार विधानसभेच्या रिंगणात
ठळक मुद्देकुणावारांची संपत्ती सर्वाधिक । शपथपत्रावर नमूद केलेल्या संपत्तीचा तपशील