लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून ८ तारखेपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रूपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रूपयाच्या खुर्चीवर बसावे लागणार आहे.चहा ६ रूपये, कॉफी-१०, लस्सी, कोल्डड्रिंक ३० रूपये, स्रॅक्स (प्रति प्लेट) २० रूपये, हे मेन्यूकार्ड हॉटेलचे नसून जिल्ह्यातील निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले दरपत्रक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी उमेदवाराने किती खर्च करावा, याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा ज्वर हळूहळू चढू लागला असतानाच उमेदवारांना खर्चाच्या बंधनाचेही भान ठेवावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारास २८ लाख रूपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे.उमेदवारांना निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने किती खर्च करता येईल, हे जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बॅण्ड पार्टी दहा व्यक्ती पथक चार हजार रूपये, बॅण्ड पार्टी २० व्यक्ती दहा हजार इतका खर्च अपेक्षित आहे. छोट्या टोप्यांसाठी १५ रुपये व गांधी टोपीसाठी २० रुपये, पक्षाचा गमचा ५० रुपये, स्टीकर सात रूपये, मुखवटा १५ रुपये या दराने खरेदीची माहिती सादर करावी लागणार आहे. वाहनचालकांना आठ तासांच्या ड्युटीसाठी ५०० रुपये देणे अपेक्षित आहे. सुमो, टेम्पो, ट्रॅक्स असल्यास प्रत्येक दिवसासाठी इंधनासह १३०० रुपये विनाइंधन एक हजार रूपये भाडे, एसी इनोव्हा- तवेरासाठी १५०० रूपये अवजड ट्रकसाठी डिझेलसह नऊ हजार, बिनाडिझेल सहा हजार रूपये प्रत्येक दिवसाला याप्रमाणे भाडे असेल. ५० आसनी बससाठी आठ हजार इंधनासह तर सहा हजार बिनाइंधन, इंधनासह तीनचाकी ऑटोसाठी हजार रूपये व इंधनाविना ९०० रूपये, दुचाकीसाठी दोनशे रूपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.लाऊडस्पिकरचेही भाडे ठरलेमाई-लाऊडस्पिकर (एक माईक दोन स्पिकर) ७५० रूपये, प्रत्येक दिवसासाठी चार स्पिकर आणि दोन मायक्रोफोन चार हजार रूपये, व्हिडीओग्राफी कॅमेरा प्रत्येक दिवसासाठी दीड हजार रूपये आणि स्टेजवरील सायडिंगसाठी १२०० रूपये दर आहे. या दराप्रमाणे बिल द्यावे लागेल.साधा हार ३० रूपयेप्रचारफेऱ्यांमध्ये फुलांसह गुच्छांचा होणारा वापर लक्षात घेऊन त्यासाठीही दर निश्चित केले आहेत. साध्या हारासाठी ३० रूपये, मध्यम हारासाठी २५ रूपये, मोठ्या हारासाठी ५० रूपये आहे.तर प्रचार करून भूक लागल्यावर जेवण, नाश्त्यासाठीही दर निश्चित केले आहेत. व्हेज लंच, राईस प्लेट, प्रत्येकी ९० रूपये दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी वेगळे दर ठरविले आहेत. व्हेज थालीसाठी शंभर रूपये नॉनव्हेज थालीसाठी २०० रूपये असे हे दर आहेत.
Maharashtra Election 2019 :मतदारांना बसण्यास सहा रूपयांची खुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST
कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रूपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रूपयाच्या खुर्चीवर बसावे लागणार आहे.
Maharashtra Election 2019 :मतदारांना बसण्यास सहा रूपयांची खुर्ची
ठळक मुद्देनिवडणुकीचे दर निश्चित : पुढारी बसणार ३०० रूपयांच्या सोफ्यावर