आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभेचा रणसंग्राम सुरू होताच उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या आकड्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. तसेच प्रशासनानेही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवमतदारांची नोंद केली असून यावर्षी १८ ते १९ वयोगटातील १८ हजार ८३ मतदार हक्क बजावणार आहेत. तर वयाची ८० वर्षे पार केलेल्या मतदारांची संख्या ४२ हजार ३३६ आहे. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्तेही या वृद्ध मतदारांना हक्क बजावण्याकरिता आग्रही राहणार आहेत.जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार मतदारसंघांत निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. चारही मतदारसंघांतून ११ लाख ४९ हजार ७५८ मतदारांच्या भरवशावर ४७ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये ५ लाख ८८ हजार ५८३ पुरुष तर ५ लाख ६१ हजार १६१ महिला मतदार आहेत. या लोकशाहीच्या उत्सवात सर्व नवमतदारांनी आपला हक्क बजावावा म्हणून प्रशासनाकडूनही यावर्षी नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत १ लाख २९ हजार ६०३ मतदार वाढले आहेत.प्रशासनाच्या यादीनुसार चारही मतदारसंघांतील मतदारांची वयानुसार विभागणी केली आहे. त्यामध्ये ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक मतदार असून त्यांची संख्या २ लाख ६७ हजार १५७ आहेत. तर सर्वांत कमी मतदारांची संख्या ही ९० वर्षे पार केलेल्या मतदारांची आहे. विशेषत: आयुष्याची सत्तरी गाठलेल्या मतदारांची संख्याही १ लाख २१ हजार ३५३ असून यांची मत पारड्यात पाडण्यासाठी गावोगावी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.९५० मतदारांचे शतक पूर्णवयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी प्रत्येकालाच मिळते. त्यांचे एक मत देशाचे चित्र बदलण्याकरिता निर्णायक असल्याने ते बहुमोलाचे मानले जाते. जिल्ह्यात सध्या आयुष्याचे शतक पार केलेले ९६७ मतदार असून त्यामध्ये पुरुषांचीच संख्या अधिक आहे. ती ४८५ असून महिला मतदारांची संख्या ४८२ आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणेही कार्यकर्त्यांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे.
Maharashtra Election 2019 ; नवमतदारांपेक्षा वृद्ध मतदार अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST
जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार मतदारसंघांत निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापला आहे. चारही मतदारसंघांतून ११ लाख ४९ हजार ७५८ मतदारांच्या भरवशावर ४७ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. यामध्ये ५ लाख ८८ हजार ५८३ पुरुष तर ५ लाख ६१ हजार १६१ महिला मतदार आहेत.
Maharashtra Election 2019 ; नवमतदारांपेक्षा वृद्ध मतदार अधिक
ठळक मुद्देविधानसभेचा रणसंग्राम : उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी चालविली गोळाबेरीज