शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

Maharashtra Election 2019 ; साहित्य घेऊन ‘पोलिंग’ पार्ट्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST

मतदान पथकाला पुरविण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वाचावे तसेच आयोगाने दिलेले विविध अर्जाचे नमुने जबाबदारीने त्यांनी भरावे. निवडणुकीदरम्यान कुठलीही अडचण आल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. मतदान पथकाने कुठलाही ताण न घेता शांततेत काम करावे, अशा सूचना याप्रसंगी निवडणूक निरीक्षक रणबीर शर्मा यांनी दिल्या.

ठळक मुद्दे१,३१४ केंद्रांवरून होणार मतदान : ४७ उमेदवार आजमावताहेत राजकीय भाग्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाही उत्सवाचा आज खरा दिवस असल्याने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली कंबर कसली असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहे. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा या चारही मतदार संघात १ हजार ३१४ केंद्रांवर मतदान होणार असल्याने रविवारी सकाळपासूनच प्रत्येक मतदारसंघात नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले होते. त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते निवडणूक साहित्य प्रदान करण्यात आले. महामंडळाच्या १३७ बसगाड्यांसह खासगी वाहनांनी पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या.मतदान पथकाने शांततेत काम करावे - रणबीर शर्मावर्धा येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी मतदान साहित्य वितरित करून पोलिंग पाटी रवाना केल्या. यावेळी निवडणूक निरीक्षक रणबीर शर्मा, जि.प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, महेंद्र सोनोणे आदींची उपस्थिती होती. मतदान पथकाला पुरविण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वाचावे तसेच आयोगाने दिलेले विविध अर्जाचे नमुने जबाबदारीने त्यांनी भरावे. निवडणुकीदरम्यान कुठलीही अडचण आल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. मतदान पथकाने कुठलाही ताण न घेता शांततेत काम करावे, अशा सूचना याप्रसंगी निवडणूक निरीक्षक रणबीर शर्मा यांनी दिल्या.मतदान करतेवेळी ‘सेल्फी’ काढणाऱ्यांवर होणार कारवाईआर्वी येथे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तर हिंगणघाट येथे चंद्रभान खंडाईत तर देवळी येथे मनोज खैरनार यांच्या नेतृत्वात रविवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय पथकांना रवाना करण्यात आले. मतदान पथकाने मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरुप मतदान घेणे अनिवार्य आहे. यात कमीत कमी ५० मत टाकणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करावी. मतदानासाठी असलेले साहित्य संबंधितांनी काळजीपूर्वक तपासावे. कुठल्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र व पोस्टर मतदान केंद्रात नसावे. असल्यास ते झाकून ठेवावे. विशेष म्हणजे, मतदान करतेवेळी फोटो, व्हिडिओ अथवा सेल्फी काढण्यावर बंदी आहे. तसे आढळल्यास केंद्र प्रमुखाने तातडीने पोलिसांना कळवावे, असा सूचना यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :wardha-acवर्धा