लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्या ४० वर्षांत देवळी-पुलगाव मतदारसंघामध्ये मूलभूत सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहे. आता या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन करण्याची संधी चालून आली आहे, ही संधी गमावू नका, असे आवाहन देवळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी केले.देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.ही शिकलेली मुले ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतील, असा मला विश्वास आहे. मागील २० वर्षांपासून कॉँग्रेसच्या आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केले, हे जनतेने आता ओळखले पाहिजे. एका नव्या पर्वाची सुरुवात या निवडणुकीच्या निमित्ताने केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी शिवसेनेचे बाळा शहागडकर, अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचिन भिरे, सुरेश डफळे, डिगडोह जि.प. सदस्य मयुरी मसराम, प्रवीण येसनखेडे, सुभाष कुरंजेकर, पुरुषोत्तम भोगेकर, भगवान मोडक, गोपाल कुरंजेकर, किसान जबडे, खतेश्वर येसनखेडे, ईसापूरचे सरपंच प्रणिता आंबटकर, उपसरपंच नितीन करपते, सदस्य विनय महाजन, चंदू गोहे, संदीप ढगे, प्रफुल्ल कारमोरे, रत्नापूरचे सुधीर बोबडे, गुणवंत खडसे, गजानन राऊत, सागर कडू, बाबाराव खडसे, साहेबराव सायंकार, किशोर मुडे, खुशाल आकरे यांच्यासह शिवसेना व भाजपचे सर्व पदाधिकारी, गावकऱ्यांची प्रचार रॅली व बैठकीत उपस्थिती होती.व्यापाऱ्यांशी साधला समीर देशमुखांनी संवादपुलगाव- देवळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांनी पुलगाव येथे प्रचारफेरी काढून व्यापारी बांधवांशी संवाद साधला. यावेळी व्यापारी बांधवांनी समीर देशमुख यांना राजकीय आयुष्यासाठी आशीर्वाद दिलेत. आपले आजोबा बापूरावजी देशमुख, वडील माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी आमचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध राहिले आहेत. दाआजी नेहमी देवळी-पुलगाव भागाशी जुळलेले होते. त्यांच्यासाठी हा भाग या भागातील लोक परिवारासारखे होते, अशी भावना अनेक जुन्या व्यापाºयांनी व्यक्त केली. आपणही आमच्यासाठी निश्चितपणे काम कराल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दौºयाच्या निमित्ताने पुलगाव येथील अनेक व्यापाºयांनी ऋणानुबंधांना नव्याने उजाळा दिला. अनेक व्यापाºयांनी या भागातील त्यांच्या अडचणी समीर देशमुख यांच्या कानी घातल्या. यावेळी संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, देवळी-पुलगाव मतदारसंघाचे समन्वयक रविकांत बालपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST
देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहोत. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका
ठळक मुद्देसमीर देशमुख यांचे आवाहन : विविध गावांमध्ये मतदारांशी साधला थेट संवाद