शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; मोबाईल जामरच्या मागणीसाठी अपक्ष उमेदवाराची वीरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : यंदा विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजकीय भविष्य आजमावत असलेल्या उमेदवार श्याम भास्कर इडपवार यांनी ...

ठळक मुद्देपाण्याच्या टाकीवर चढून रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यंदा विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राजकीय भविष्य आजमावत असलेल्या उमेदवार श्याम भास्कर इडपवार यांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल जामर लावण्याची मागणी बुधवारी रेटली. इडपवार यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सदर मागणी रेटल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान श्याम इडपवार यांनी सदर मागणीचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सादर केले. हे आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आले.विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत एका उमेदवाराला लाख मते तर इतर सर्व मित्राची उमेदवाराची अनामत जप्त अशीस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मतमोजणीदररम्यान पारदर्शकता रहावी या हेतूने मतमोजणीच्या परिसरात मोबाईल जामर बसविण्यात यावे, अशी मागणी यावेळी श्याम इडपवार यांनी याप्रसंगी केली. बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान श्याम इडपवार यांनी तहसील पाण्याच्या टाकीवर चढून आपली मागणी रेटत त्याकडे नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सदर आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार सत्यवीत बंडीवार यांनी आंदोलनस्थळ गाठून भ्रमणध्वनीच्या सहाय्याने इडपवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. शिवाय पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्याचे आवाहन केले. त्यानंतर इडपवार यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खाली उतरून मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. सदर आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडून दिल्याचे सांगण्यात येते. एकूणच या आंदोलनामुळे परिसरात आणि तहसील कार्यालयातील अधिकाºयांची तसेच पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांची एकच तारंबळ उडाली होती.

टॅग्स :wardha-acवर्धाMobileमोबाइल