शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :‘मत’उत्सवाचे ‘दान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सोबतच हा लोकशाही उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावा याकरिता प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली.

ठळक मुद्देबजावले राष्ट्रीय कर्तव्य : चारही मतदारसंघांत उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी लोकशाहीतील मतोत्सव साजरा करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करुन आपल्या उमेदवाराला मताचे दान केले.विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सोबतच हा लोकशाही उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावा याकरिता प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली. अखेर मतदानाचा दिवस उजाडला आणि चारही मतदार संघातील एकूण १३१४ मतदार केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील नवमतदारापासून तर वृद्ध मंडळींनीही या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होऊन आपला अधिकार बजावला. बऱ्याचश्या भागामध्ये संथगतीने मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पहिल्या टप्प्यातील मतदान हे कमीच होते.दुपारनंतर मतदारांची ठिकठिकाणी गर्दी उसळली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची दाट शक्यता होती. परंतु निसर्गानेही या उत्सावाकरिता साथ दिल्याने सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले.लोकप्रतिनिधींनीही रांगे उभे राहूनच केले मतदानमतदानाचा अधिकार हा सर्वांनाच सारखा असलेल्या हा अधिकार बजावताना लोकप्रतिनिंधीसह मोठ्या अधिकाऱ्यांनाही सारखाच न्याय दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदारांसह माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यासह विधानसभा निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार यांनीही आपापल्या मतदार संघातील मतदान केंद्रावर हजेरी लावली. त्या ठिकाणी मतदानाक रिता असलेल्या मतदारांच्या रांगेत उभे राहूनच आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे सर्वसामान्य मतदार राजांनाही त्यांना एका मतदानाचे महत्त्व कळाले.नवमतदारांमध्येही मतदानाचा संचारला होता जोशजिल्ह्याच्या आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा या चारही मतदार संघात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १८ हजार ८३ मतदार आहे. यातील काही मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणारे असल्याने त्यांच्यामध्ये आज जोश दिसून आला. आपल पहिल मतदान हे वाया जाता कामा नये म्हणून अनेकांनी विचारपूर्वक मतदान केले. त्यानंतर सेल्फी काढून ‘मी केले प्रथम मतदान...’ असे व्हाट्स अ‍ॅपवर स्टेटसही ठेवले आहे. यासोबत मतदानाचा टक्का वाढीच्या दृष्टीने आणि मतदानाचे महत्व इतरांना कळावे म्हणून सोशल मिडीयावर मतदान करण्याचे आणि मतदान केल्याचे अनेक संदेश झळकताना दिसून आले. त्यामुळे आज सोशल मिडीयाही या मतोत्सवात हाऊसफुल्ल झाला होता.

मतदान केंद्रावर सोईसुविधांचा अभाव, स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्यविधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून दुप्पट करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत,लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांकरिता वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन, रॅम्पची व्यवस्था,पिण्याचे पाणी,विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहाची सुविधा व्यवस्था करण्यात करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाचे त्याची अंमलबजावणी केली परंतु ग्रामीण भागात काही ठिकाणी या सुविधांचा अभाव होता. वर्ध्यातील राष्ट्रभाषा येथील मतदान केंद्रावर अपंगाकरिता व्हीलचेअर नसल्याची ओरड मतदारांकडून करण्यात आली. विशेषत: प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवकांनी आपले मोलाचे कर्तव्य बजावले. 

टॅग्स :wardha-acवर्धा