शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्य सैनिकही रिंगणात : अर्धेअधिक उमेदवार व्यावसायिक व शेतकरी, नोकरदार; गृहिणींची पाठ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारे येतात आणि जातात; परंतु शेतकऱ्यांच्या समस्या काही केल्या सुटता सुटत नाहीत. त्यामुळे शेतीशी नाळ जुळलेला आणि शेती व्यवसायाची माहिती असलेलाच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, असे मतदारांकडून बोलले जाते. पण, शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी व्यावसायिक आणि शेती असलेल्या परंपरागत उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याने नोकरदार व गृहिणींनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही फारसा उत्साह दाखविला नसल्याचे चित्र आहे.वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी असे चार विधानसभा मतदारसंघ असून या चारही मतदारसंघातूून ४७ उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रावरून त्यांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध झाला आहे. त्यानुसार निवडणूक रिंगणात असलेल्या ४७ उमेदवारांपैकी ३१.९१ टक्के उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचे साधन व्यवसाय व ३१.९१ टक्के उमेदवारांनी शेती दाखविले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेती आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांचे प्रमाण समान असल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच वकील, पेन्शनर व नोकरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ६.३८ इतकी दर्शविली आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि मजुरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ४.२५ इतकी असून २.१२ टक्के उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. विशेषत: देवळी विधानसभा मतदारसंघातील एक स्वातंत्र्य सैनिकही या निवडणूक रिंगणात उभा ठाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणसंग्रामात काही प्रमाणात का होईना पण, सर्वसमावेशक उमेदवार आपले भविष्य अजमावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.विधानसभा मतदारसंघानिहाय उमेदवारांचे ‘प्रोफाईल’वर्धा मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचा व्यवसाय आहे. पाच उमेदवार शेतकरी असून एक उमेदवार हे वकील आहेत.

आर्वी मतदारसंघच्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार व्यवसाय करतात. तसेच तीन उमेदवार शेतकरी असून प्रत्येकी एक जण नोकरी, वकील, सेवानिवृत्त कर्मचारी व मजूर आहे.हिंगणघाट मतदारसंघया मतदारसंघातील तेरा उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. शेती करणाºया उमेदवारांची संख्या पाच असून नोकरी करणारे दोन व प्रत्येकी एक जण स्वयंरोजगार, मजुरी व काहीच न करणारे आहे.

देवळी मतदारसंघया मतदारसंघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सहा उमेदवार व्यवसाय करणारे आहेत. तीन उमेदवार शेतकरी आहेत. तर प्रत्येक एक उमेदवार शिक्षक, पेन्शनर, वकील, माजी सैनिक व स्वयंरोजगार असलेले आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा