लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील जिल्हा परिषद कै. गोपालराव वाघ प्राथमिक शाळा क्र. ४३ येथे सायंकाळी ५.३० वाजता मतदारांची प्रचंड गर्दी उसळली. मतदारांची गर्दी पाहून कर्तव्यावर असलेले मतदान अधिकाऱ्यांनी मशीनमध्ये बिघड आल्याची बोंब मारली. त्यानंतर लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी पोहचले तर मशीन सुरूच होती. असे असले तरी जबाबदार अधिकाºयाकडून उलट सुटल चर्चा पसरविण्यात आल्याने अनेक मतदारांना आल्या पावली परतावे लागले, हे तितकेच खरे.प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदार फारच धिम्यागतीने मतदानासाठी आले. ५ वाजता अचानक मतदारांची गर्दी उसळली. पोलीस बंदोबस्तामध्ये मतदारांची लांबच लांब रांग लागली होती. गर्दी जास्त असल्यामुळे अनेक मतदार थांबायला तयार नव्हते. मात्र, अनेकांची इच्छा असल्याने सायंकाळी ६ वाजल्यावरही रांगा कायम होत्या. नियोजन शुन्य कारभारामुळे सुमारे २०० मतदारांना आपल्या पावली घरी परतावे लागले.सायंकाळी ६ नंतर ७ पर्यंत ४५ मतदारांना आतमध्ये घेऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी पोलिसांचे दबावतंत्र वापरून फोटो घेण्यास मज्जाव करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके यांनी मतदारांना व पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळही केली.विशेष म्हणजे सदर प्रकरणी काही मतदारांनी पोलीस उपनिरीक्षकाची थेट पोलीस अधीक्षकाकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली. तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदारांनी याप्रसंगी बघ्याचीच भूमिका घेतल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही मतदारांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
Maharashtra Election 2019 : अधिकाऱ्याकडूनच मशीनमध्ये बिघाडीची बोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST
मतदान अधिकाऱ्यांनी मशीनमध्ये बिघड आल्याची बोंब मारली. त्यानंतर लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी पोहचले तर मशीन सुरूच होती. असे असले तरी जबाबदार अधिकाºयाकडून उलट सुटल चर्चा पसरविण्यात आल्याने अनेक मतदारांना आल्या पावली परतावे लागले, हे तितकेच खरे.
Maharashtra Election 2019 : अधिकाऱ्याकडूनच मशीनमध्ये बिघाडीची बोंब
ठळक मुद्देवेळेअभावी मतदार परतले घरी : कार्यप्रणालीवर उपस्थित केले प्रश्न