शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.

ठळक मुद्देनाराजांची संख्या वाढतीवरच : विकासाचा मुद्दा पडला मागे, देवळीत कॉँग्रेस उमेदवाराचा राष्टÑवादीचे साथ सोडला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात यावेळी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तीन मतदारसंघात कॉँग्रेस आघाडी व भाजप-सेना युतीत थेट लढत असल्याचे दिसून येत आहे. थेट लढतीमध्ये प्रस्थापित लोकप्रतिनिधींचा मोठा कस प्रचारादरम्यान लागत आहे. तसेच गेल्यावेळी रिंगणात असलेले अनेक उमेदवार बाहेर असल्याने त्यांचीही भूमिका या निवडणुकीत अंत्यत महत्त्वाची ठरणार आहे.आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अमर शरद काळे यांचा सामना भाजप-सेना युतीचे उमेदवार दादाराव केचे यांच्यासोबत आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन ते तीन हजार मतांच्या अंतराने या मतदारसंघाचा निकाल फिरत राहिला आहे. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघात कसदार लढाई होणार आहे. दादाराव केचे यांनी मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघात मंगळवारी कॉँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र आणखी स्पष्ट होईल. या मतदारसंघात विद्यमान आमदारांसमोर अ‍ॅन्टी इन्कबन्सीचा प्रश्न प्रभावीपणे उभा आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक आधारावर या मतदार संघात प्रचाराने जोर पकडला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस व बंडखोराने अनेक भागात जोरदार धडाका लावल्याने भाजपसमोर अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. येथे राष्ट्रवादीला कॉँग्रेसची समर्थ साथ असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भाजपला सेनेची साथ असल्याचे कुठेही दिसत नाही. सेनेने बंडखोरांवर अजूनही कारवाई केली नसल्याने सेनेचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी जोरदार कामाला लागले आहेत.वर्धा मतदारसंघात विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणारे विद्यमान आमदार पंकज भोयर यांची प्रचार यंत्रणा गावागावांत कामाला लागली आहे. मात्र, या मतदारसंघात त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे तुल्यबळ आव्हान आहे. कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.देवळी मतदारसंघात कॉँग्रेसच्या विद्यमान लोकप्रतिनिधीविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या या लोकप्रतिनिधीचे एकही ठोस काम त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांसमोर मांडलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.भाजपचे खा. रामदास तडस यांच्यासह माजी खा. सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, ज्येष्ठ नेते प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी तसेच सेनेचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कॉँग्रेस पक्षातून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व नेते शिवसेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे कॉँग्रेसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या मतदारसंघात अपक्ष म्हणून राजेश बकाणे यांनीही जोरदार प्रचार चालविला आहे. येथे बहुजन समाज पक्षासह वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार निर्णायक राहणार आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा