लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीदरम्यान ११ एप्रिल या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वर्धा लोकसभा मतदार संघातील तीन मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षांवर निवडणूक कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांची एक वर्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याच्या सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे सदर तीन मतदान केंद्रांपैकी दोन केंद्र वर्धा जिल्ह्यातील आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा लोकसभा क्षेत्रात ११ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. वर्धा लोकसभा मतदार संघात असलेल्या धामणगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १५२ मुंड मल्हार कोणेर, आर्वी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ९ द्रुर्गवाडा व वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक २८९ नालवाडी येथील केंद्राध्यक्षांनी ‘मॉक पोल’ची प्रक्रिया केल्यानंतर ईव्हीएम कंटोल युनिट मशीन क्लियर म्हणजे निकाल निरंक प्रक्रिया न करता प्रत्यक्ष मतदान प्रकिया सूरू केल्याने व्हीव्हीपॅटमधील ड्रॉप बॉक्स मधील मतदानाच्या चिठ्ठ्या व मतदानाअंती तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी मधील मतांची संख्या व ईव्हीएम मधील निकाल यात तफावत आढळून आला आहे.मतदान केंद्राध्यक्षांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त असते. परंतु, या प्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी, मंत्रालय, मुंबई यांच्या कार्यालयाकडून सदर गंभीर चुकांबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील मागविण्यात आला आहे.तेव्हा सदर मतदान केंद्रांवरील केंद्राध्यक्षांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असून धामणगाव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक १५२ मुंड मल्हार कोणेर, आर्वी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक ९ द्रुर्गवाडा व वर्धा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक २८९ नालवाडी या मतदान केंद्रांवरील केंद्राध्यक्षांनी गंभीर स्वरूपाची चूक केल्यामुळे त्यांची एक वर्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी थांबविण्यात यावी, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा यांनी दिल्या आहेत.संबंधित विभागाने आपल्या स्तरावरून कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
Maharashtra Election 2019 ; निवडणूक विभागाने ‘त्या’ तीन केंद्राध्यक्षांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST
मतदान केंद्राध्यक्षांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त असते. परंतु, या प्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Maharashtra Election 2019 ; निवडणूक विभागाने ‘त्या’ तीन केंद्राध्यक्षांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली
ठळक मुद्देनिर्णयामुळे खळबळ : लोकसभेच्या कामकाजातील हयगय भोवली