शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; देवळी मतदारसंघात रॅलीतून समीर देशमुखांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारप्रमाणे राज्यात भाजप-सेना युतीचे लोकप्रिय सरकार आणावयाचे आहे. लोकसभा मतदार क्षेत्रात ज्याप्रमाणे मला भरघोस मतांनी विजयी केले, त्याचप्रमाणे या ठिकाणी युतीचे उमेदवार समीर देशमुख यांना विजयी करावयाचे आहे, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देपुलगावसह ठिकठिकाणी निघाली रॅली।

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांच्या निवडणूक प्रचारार्थ देवळीसह मतदार संघात अनेक गावात रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सकाळी देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली फिरवून पक्षाच्या ध्येयधोरणाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी युतीचे उमेदवार समीर देशमुख, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, डॉ. शिरीष गोडे, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, जि.प. चे माजी सभापती मिलिंद भेंडे, न. प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, जि. प. सदस्य मयुरी मसराम तसेच न. प. सभापती नंदू वैद्य, शिवसेनेचे अनंता देशमुख यांची उपस्थिती होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारप्रमाणे राज्यात भाजप-सेना युतीचे लोकप्रिय सरकार आणावयाचे आहे. लोकसभा मतदार क्षेत्रात ज्याप्रमाणे मला भरघोस मतांनी विजयी केले, त्याचप्रमाणे या ठिकाणी युतीचे उमेदवार समीर देशमुख यांना विजयी करावयाचे आहे, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी जाहीर सभेत केले.या सभेला नगरसेवक नंदू वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रचार रॅलीत न. प. सदस्य मारोती मरघाडे, संध्या कारोटकर, सुनीता ताडाम, सुनीता बकाणे, सारिका लाकडे, शिवसेनेचे महेश जोशी, दशरथ भुजाडे, दिलीप कारोटकर, संजय ताडाम, वैभव कडू, उमेश कामडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ पुलगाव येथेही शक्ती प्रदर्शन करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, भाजपाचे नेते संजय गाते, मंगेश झाडे, अ‍ॅड. विद्याधर माखणे, दिलीप पटले, विनय मेटे, विनोद बाभुळकर, निलेश गुल्हाणे, संदीप कुचे, सलीम हुसैन, आशीष पांडे, सागर टाके यांच्यासह शिवसेना भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मतदार संघातील अल्लीपूर, तरोडा, तळेगाव (टालाटुले), भिडी, अंदोरी, आंजी (मोठी), वायफड, वायगाव (नि.), गुजखेडा, इंझाळा, कानगाव आदी भागातही शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी समीर देशमुख यांच्या प्रचारार्थ रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.

टॅग्स :wardha-acवर्धा