शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

Maharashtra Election 2019 ; आता होताहेत दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६१.७६ टक्के मतदान : वर्धा विधानसभा मतदारसंघ पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोमवारी काही मतदान केंद्रावर सायंकाळी ६ च्या पूर्वी मतदारांनी एकच गर्दी केल्याने रात्री उशीरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान सुरूच होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रत्यक्ष किती टक्के मतदानांनी मतदानाचा हक्क बजावला याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला मिळाली. वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात एकूण ६१.७६ टक्के मतदान झाले असून तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्राप्त माहितीनुसार वर्धा विधानसभा मतदार संघातील एकूण २ लाख ६२ हजार ३८९ मतदारांपैकी १ लाख ७६ हजार ४५५ मतदारांनी मतदान केले.देवळी विधानसभा मतदार संघात २ लाख ७५ हजार २३२ मतदारांपैकी १ लाख ७४ हजार ७३४ मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील २ लाख ९५ हजार ९८७ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ९३० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील ३ लाख १६ हजार ३५० मतदारांपैकी १ लाख ६८ हजार १०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा मतदानास उत्स्फुर्त प्रतिसादवर्धा, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांनी सोमवारी पार पडलेल्या लोकशाहीच्या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चारही विधानसभा मतदार संघातील एकूण ५ लाख ६१ हजार ३९८ महिला मतदारांपैकी ३ लाख २८ हजार ९८० महिला मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर १४ पैकी पाच इतर उमेदवारांनीही मतदान केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील १ लाख २८ हजार ३९८ महिला मतदारांपैकी ८२ हजार १२४ महिला मतदारांनी मतदान केले. देवळी विधानसभा क्षेत्रातील १ लाख ३३ हजार २५३ महिला मतदारांपैकी ८० हजार ७६६ महिला मतदानांनी मतदान केले. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५२ हजार ६५५ महिला मतदारांपैकी ८७ हजार ८१० महिला मतदानांनी मतदान केले. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५६ हजार ४१५ महिला मतदारांपैकी ७८ हजार २८० महिला मतदानांनी मतदान केले.उमेदवारांसह मतदारांना निकालाची उत्सुकतासोमवारी विधानसभा निवडणुकीचा महत्वाचा भाग असलेली प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडली. शिवाय सध्या उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आहेत. असे असले तरी आता उमेदवारांसह मतदारांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.गुरूवार २४ ऑक्टोबरला जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी या चारही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच विजयाच्या चर्चेला पुर्ण विराम मिळणार आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा